Thursday, May 21, 2009

ख्वाहिशों के बिना जिंदगी क्या? करो ज्यादा का इरादा! Max Newyork Life Insurance



>>>


आणखी एक उत्तम जाहिरात! सुंदर कास्ट!! आणि अप्रतिम जिंगल!!! एकुण ८ जण.

ह्या गाण्याचे शब्द आहेतः

नजर को क्या चाहिये ख्वाब थोडे ज्यादा अरे ख्वाब को क्या चाहिये रंग थोडे ज्यादा
कर ले दिल ज्यादा का इरादा

कर ले दिल ज्यादा का इरादा

है है है चांद मेरे पास है सुरज तो ला दों जरा

नजर को क्या चाहिये ख्वाब थोडे ज्यादा


"ख्वाहिशों के बिना जिंदगी क्या? MAX NEWYORK LIFE INSURANCE करो ज्यादा का इरादा!"


कस काय घडलय ते आता पाहू: [एकुण ८ जण आहेत ह्या जाहिरातीत मुख्य पात्र ५]

(१) एक तरूण मुलगा मोठी मोठी झुलप असलेला रस्ता ओलांडत असतो अन् तिथे तो एक पॉवरफूल बाईक बघतो>> अन् मनात विचार की काश मेरे पास भी ऐसी ही... सिग्नल संपतो (२)तो बाईकवरचा माणूस जात असताना विरूद्ध दिशेनं येणार्या बाईकवर (३,४)एक कपल असतं आता हा त्या बाईकवर मागे बसलेल्या मुलीकडे बघत असतो अन् मनात विचार की काश मेरे पीछली सीट पर भी... आता ती बाईकवर बसलेली मुलगी रस्त्याच्या कडेने जाणार्या (५,६,७)दोन सॉलिड्ड गोंडस मुलांच्या आईकडे पाहात असते अन् मनात विचार की काश मेरे भी...>> आता ती आई एका शॉपिंग मॉल मधे एक अतिशय सुंदरसा नेकलेस बघत असताना.. अन् मनात विचार की काश मेरे पास भी ऐसा...>> नेमक्या त्याच वेळेला तो नेकलेस त्या दुकानातला माणूस(८) एका पॉश सुटातल्या फोनवर बोलत असलेल्या टकलू माणसाला देतो. आणि मग त्याच्या मर्सिडिझचा दरवाजा दुकानातला माणूस त्याच्यासाठी उघडतो! अन् तो मर्सिडिझमध्ये बसलेला माणूस आपल्या सिरिज मधल्या पहिल्या तरूण मोठी मोठी झुलप असलेल्या मुलाकडे पाहात आपल्या डोक्यावरून हात फिरवतो...>>


आणि जाहिरातीतला शेवटचा पंच येतो निवेदक म्हणतो:

ख्वाहिशों के बिना जिंदगी क्या? MAX NEWYORK LIFE INSURANCE करो ज्यादा का इरादा!

ही जाहिरात मी कित्तीतरी वेळेला बघितली फारच आवडली म्युझिक आणि गाणं हे केवळ अप्रतिम आहे. तरीही जाहिरात पाहात असताना काही फोलपणा जाणवतो सर्वप्रथम जो तरूण मुलगा रस्ता ओलांडत बाईक बघताना दाखवलाय ना, त्या बाईकवर किंवा शेजारच्या गाडीवर नंबरप्लेट नाहीये!

सर्वसाधारणपणे आपण इकॉनॉमिक्समध्ये शिकलोय की:
"Wants are unlimited resources to satisfy wants are limited" आणखी सोप्या शब्दात सांगायच म्हटल तर
"Wants are never ending! Once you satisfy your one want another one occurs!!"
& as a result this cycle goes on endlessly.
ह्या सिद्धांताला तडा नाही जाऊ शकत!

आणि नेमकं ह्यालाच तडा ही जाहिरात देते आहे:
"MNYL's philosophy of 'Karo Zyaada ka Iraada' is a salute to all those who happily challenge status quo and push the boundaries in the search and in the creation of a bigger, brighter tomorrow.

The dream of a larger good is no longer confined to a limited few. MNYL intends to awaken today's India to re-look at itself, its realities and the possibilities and new ways to progress through its new business philosophy. 'Karo Zyaada ka Iraada' appears at a time when we as a people have realized that we'd be happier if we could articulate and then live our ambitions."

जाहिरात आवडली छानच आहे पण किती परिणामकारक ठरते ती माहित नाही!

अन् मनात प्रश्न उरतो की आपल्या गरजा, ख्वाब काहीही म्हणा त्या कधी संपतच नाहीत? आणि जर त्या संपत नाहीत तर आपण आपलं पूर्ण आयुष्य त्या गरजा पूर्ण करण्यात घालवतो जेणेकरून आपण सुखी होऊ पण खरा प्रश्न आहे की नक्की आपण कधी सुखी होतो?? किती गरजा पूर्ण झाल्या की आपण खरे खरे सुखी होतो? ह्याचा काही मापदंड आहे?





Wednesday, May 20, 2009

कुछ बोले बिन... अब सिर्फ स्टाईल बोलेगा




सुंदर जाहिरात, सुंदर जिंगल, सुंदर मुलगी!!! बास गाडीच्या बाबतीत सुंदर / अथवा चांगली म्हणणे शक्य नाही ;) कारण हिरो होंडा नावावरच गाड्या खपवते गाडीत दम नसतोच मुळी. मी विचार करतोय की हिच जर का जाहिरात महिंद्रा च्या जीपची असती तर थोडीशी वेगळी असती म्हणजे गाडीत/स्कुटीवर एक कपल.. आणि मागून बाईक्स वरून रोड साईड रोमिओ ह्या कपलला किंवा ह्या एकट्या मुलीला त्रास देतात तेवढ्यात जीप मधून हिरो उतरतो आणि हिरॉईनला ह्या रो.रोंच्या त्रासातून वाचवतो वगैरे वगैरे... बास ह्यापेक्षा वेगळ काहीही नसेल आणि शेवटी हे सगळ त्या गाडीमुळे झालं असा फील देत आपल्या प्रॉडक्टचा फायदा कसा होतो हे प्रेक्षकाच्या मनावर बिंबवण... असो जाहिरात छान आहे अन् जिंगलही सो ते टाकतोय इथं आणि पुढच्या वेळी आणखी एक जाहिरात घेऊन येतोय.

कुछ बोले बिन कहें सुने मेरे यार है जिंदगी
कुछ बोले बिन जो सब कुछ कहें अंदाज है जिंदगी
कुछ बोले बिन कहें सुने मेरे यार है जिंदगी
कुछ बोले बिन जो सब कुछ कहें अंदाज है जिंदगी
ओ हो हो हो ओ हो हो हो ओ हो हो हो ओ हो हो हो ओ हो हो हो ओ हो हो हो
कुछ बोले बिन कहे सुने मेरे यार है जिंदगी
जो सब कुछ कहें अंदाज है जिंदगी...

अरे हो आणि ही जी मुलगी आहे ना तिला स्प्लिट्सव्हिला मधून बहेर काढल होत म्हणे तिच नाव आहे हूरझान पारसी!!