माझी आऊ म्हणजे आई, मॉम, मॉम्सी काहीही... एक अजब रसायन! अर्थात प्रत्येक मुला/लीला तसं वाटत असतच. त्यात काही विशेष नाही (म्हणजे आहे खरतरं) पण आज हे लिहिण्याच काय कारण बुवा असा प्रश्न तुम्ही विचाराल तर खास कारण असं काहीही नाही माझ्या फार पुर्वीपासून मनात होत की मी ह्यावर एकदा कधीतरी लिहीन म्हणून तेच आज लिहितोय एवढचं!!
हां तर काय लिहायच? असा काही नियम वगैरे नाही फक्त काहीतरी मजेशीर अथवा अशी एखादी घटना गोष्ट की ज्याचा तुम्हे स्वप्नात सुद्धा विचार केलेला नसणारे की आपली आई असं वागेल किंवा अशी एखादी कृती जिचा तुम्हाला १००% आश्चर्यच वाटलय.
अर्थात ह्यात काहीही लिहिलेल चालणार आहे फक्त ते आईशी संबंधित असावं इतकीच माफक अपेक्षा.
हा खो खो एकावेळी कितीही जणांना द्या अन् निदान दोन तरी किस्से आपल्या आऊ बद्दल लिहाच :)
हां तर माझा एक किस्सा :-
हा तसा नवाच आहे हं आयपीएल चालू असतानाची गोष्ट आहे. मी आणि आऊ अर्थातच सच्चूच्यापाठीशी. कुठली मॅच चालू होती माहित नाही नेमकं त्याचवेळी आऊने एक प्रश्न विचारला: एक बॅट्समन ज्याम धुंवॉधार फलंदाजी करता है वो कौन? बराबर आन्सर दिया तो एक फ्रूट अॅन्ड नट ! आता हे मी कधीही बाप जन्मात इमॅजिन केल नव्हतं की माझी आऊ असं काही विचारेल कारण तो मक्ता माझ्या बाबांचा :)
तर झालं काय आम्हा कुणालाही उत्तर देता आलं नाही. तरी एक क्ल्यु आईने दिला की आत्ताच्या मॅच मध्ये तो खेळतोय! झालं आमच्या डोक्यातली चक्र फिरायला लागली पण काहीही केल्या उत्तर देता आलं नाही. आणि एकाच चान्समध्ये हे उत्तर द्यायच होतं. शेवटी हार मान्य करावीच लागली :(
विचारलं तसं शेवटी आईने ३ फ्रूट अॅन्ड नट घेतल्यावरच आऊने उत्तर दिलं आणि तो खेळाडू पूर्ण आयपीएल ज्याम चमकला तो म्हणजे आस्नोडकर.
[अर्थात आईने हे सांगाव हे विशेष! ]
आता दुसरा एक किस्सा शॉर्ट अॅन्ड स्वीट>
आता दुसरा एक किस्सा शॉर्ट अॅन्ड स्वीट>
आमच्या इथं कामाला येणार्या बाईला आई वेळोवेळी जमेल तशी मदत करते हे मला माहिती होतं पण परवा काय झालं तिला औषधोपचारासाठी काही पैश्याची गरज होती अन् शेजारपाजारचे इतर कुणी एवढी रक्कम द्यायला तयार नव्हते अर्थात बरोबरच आहे ते ती काही फार मामुली रक्कम नव्हती अन् दिलेला पैसा परत मिळेलच ह्याची ही हमी नव्हती (कारण आमच्या बाईला कॅन्सर झालाय अन् तो तिसर्या स्टेजवर पोहचलाय!) अन् तेंव्हाच मी आईला म्हटल की अगं कशाला तिला एवढा पैसा देत्येस रिटर्न्स अपेक्षित आहेत का? अन् बरच काही बोललो होतो...
वास्तविक पाहता पैसा आईचा तेंव्हा तिनं हा सारा विचार करूनच हा निर्णय घेतला असणार. आऊ काहीच बोलली नाही दोन क्षण थांबून म्हणाली अरे एवढं म्यानेजमेंट शिकलास तू पण त्याचा उपयोग काय?
मला पी एफ, ग्रॅच्युटी मिळतं ते सारं तिला मिळत का?? पेड/ प्रीव्हीलेज लीव्ह मिळते का?? नाही ना? अन् मग अश्या वेळी जेंव्हा तिला अत्यंत गरज आहे तेंव्हा मी मला पैसा परत कसा मिळेल ह्याचा विचार करणं कितपत योग्य आहे?
रिटर्न्स काय ह्याचा विचार करायला हे काय इन्व्हेस्टमेंट नाहीये तू समजतोस तसं.
ही आहे एक नात्यातली इन्व्हेस्टमेंट! प्रत्येक वेळी बुद्धीने, जे प्रॅक्टिकल वाटतं तसे निर्णय घ्यायचे नसतात हे जेंव्हा तुला उमजेल ना तेंव्हा ह्या शिक्षणाचा, डिग्रीचा खरा फायदा होईल.
अन् मी विचार केला तेंव्हा पटलं मला पण मग मी असं का बोललो ह्याच उत्तर नाहीये आज माझ्याकडे म्हणून हा लिखाण प्रपंच. हा धडा काही केल्या मी विसरणार नाही... बस्सं चुकलो मी हेच खरं
माझा खो कुणाला बरं...
जास्वंदी
सई
सई (केसकर)
शमा (संवादिनी)
प्रशांत
3 weeks ago