अट्टल चहा बाजांना उकाळा हा प्रकार माहित असेल. चहाच्या स्टॉलवर चहा ( च पाणी!! ) उकळवून कडक केलेला चहा म्हणजे उकाळा. तर अश्या ह्या उकाळ्याची किंमत किती असावी साधारण इराणी हॉटेलात ६ रू स्टॉलवर ४ रू. हॉटेलात १०/१५ रू (उकाळा नसतो! इथं बरंका) मोठ्या पंचतारांकित हॉटेलात १००/२०० च्या आसपास असावी. (मला अनुभव नाही!)
पण जर एके दिवशी स्टॉलवरचा ६ रू.चा उकाळा जर तुम्हाला कुणी ६१२ रू. ना पडला तर???
तुम्ही प्याल का? नाही ना? पण आम्ही प्यायला. त्याच झालं असं अगदी परवा परवाची गोष्ट आहे ही...
चहा प्यायला म्हणून आम्ही दोघं बाहेर पडलो.. कधी नव्हे ती गाडी काढली शनवार (शनिवार ?) होता मग ठरवलं की चहा पिऊन बाहेर जेवायला जाऊ. मित्राने गाडी सुस्साट काढली सिग्नल यलो होत होता तेवढ्यात सटकू असा विचार... गाडी उजवीकडे वळवली अन् सिग्नल लाल!! भर चौकात आमची गाडी मधोमध उभी फार स्पीड नव्हता.. झालं!! मामा आले.
मामा: गाडी साईडला लावा अन् बाहेर या.
मी::मामा जाऊ द्या ना हो प्लीज जरा घाईत आहे...
मामा: जा की पण जरा लायसन दाखवा, पेपर, पीयूसी बघू.
मित्र : गाडी साईडला लावत अन् मी लायसन दाखवत बोललो साहेब जाऊद्या ना हो प्लीज..
मामा: हं पेपर द्या
मी: दहा मिनिटं पेपर शोधत होतो गाडीत... (बरोबर घेतलेच नव्हते!)
मामा: नाहीयेत का? बरं पीयूसी?
मी: हे घ्या पीयूसी..
मामा: हे एक्स्पायर झालय की हो परवाच
मी: हो झालंय खरं
मामा: इन्श्यूरन्स?
मी: ...
मामा: तो ही रिन्यू करायचाय
मी: हो राहिला खरा (अरे देवा )
मामा: फाईन भरा... एकंदर ६०० रू.
मी एटीममधून ६०० रू. काढून फाईन भरून निघालो तेवढ्यात मित्र म्हणाला अरे चहा प्यायचाय ना?
मी: एवढं सगळं झाल्यवर तुला चहा प्यायचाय का?
मित्र: हो तुला नकोय का?
मी: चला.
चहाच्या स्टॉलवर...
मी: म्हाराज दो उकाला देना
मनात( एक उकाळा ६१२ रुपयांना)
मित्र: अरे तुझ्या गाडीचे ब्रेक्स नीट लागत नसावेत जरा चेक करून घे ना.
मी: प्रकट हो का> साल्या तुला काय घाई होती???? !@#$%^ #$%#^ #!$!$%
मी ह्यावरनं एकच धडा शिकलो!
चहा फार पिऊ नये!! तल्लफ आलीच आणि आवरता आली नाहीच तर गाडीतन न जाता पायी जावं अथवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा. गाडीत कायम पेपर्सची निदान फोटोकॉपी तरी ठेवावी!
3 weeks ago