Wednesday, March 25, 2009

मुलीच हुशार असतात अन् मुलं डम्ब

kuldeep1312 | 25 मार्च, 2009 - 12:01
सुप्र. मंडळी,
पा शा मो ऑ.> गेले काही दिवस मी समजून चालत होतो की मुली डम्ब असतात अन् मुलं हुशार! (वयोगटाची अट नाही!) पण आता कळून चुकलय की अस नसत मुलीच हुशार असतात अन् मुलं डम्ब, माठ असतात! <पा शा मो ऑफ
अन् ह्यावर तोडगा शोधण्यासाठी मी लगेच गायबतो आहे
*********************

"जसं शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरावे तसच अनुल्लेख हे ही शस्त्र आहे आणि ते जास्त परिणामकारक आहे"
• संपादन

limbutimbu | 25 मार्च, 2009 - 12:05
>>>> ह्यावर तोडगा शोधण्यासाठी मी लगेच गायबतो आहे
कुलदिप्या, माठ्या , यावर तोडगा शोधण्यासाठी, तू गायब होऊन चालणार नाही, उलट तू ठामपणे "उभा राहिला पाहिजेस"
...;
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

kuldeep1312 | 25 मार्च, 2009 - 12:19
लिंबूदा अहो मी "केंव्हापासूनचा उभा" आहे पण काय उपयोग? आपलेच लोक (म्हणजे स्वजातिय म्हणजे आपल स्वलिंगीय ह्याला दुसरा शब्द काय आहे ) अडथळे आणतात काय बोलाणार? >> काही बोलायाचे आहे....
*********************
"जसं शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरावे तसच अनुल्लेख हे ही शस्त्र आहे आणि ते जास्त परिणामकारक आहे"

• संपादन

gajanandesai | 25 मार्च, 2009 - 12:21

कुलदीप, तुझी स्वाक्षरी ही तुझ्या कोणत्या शोधनिबंधाच्या प्रबंधाचा सारांश आहे बरे?


psg | 25 मार्च, 2009 - 12:22
अरे, 'गायबतो आहे' सांगून २० मिनिटात आलास होय परत
चांगलं गंडवतोस हां!
-----------------------------------
Its all in your mind!


SAJIRA | 25 मार्च, 2009 - 12:27 नवीन
शोधनिबंधाच्या प्रबंधाचा सारांश >>>
माबोवर दोन दिवसांत कळते ते. हो की नाही कुल्दीप्या? ते डंब, माठ अन हुशार कुठून शोधलंस, ते विचारायला पाहिजे त्याला.
(बघ, मी नाही ना केला तुझा अनूल्लेख कुल्दीपका? )
बदाबदा फोटू येऊन प्रसिध्दी झाल्यामूळे झक्कीबोवांना अचानक सिलेब्रेटी झाल्यागत वाटत असावे. त्यामूळे हा मुहूर्त साधून काय वाट्टेल ते बडबडून घेत असावेत ते.
काय उपाय करू या आता? थांबा, संध्याकाळपर्यंत करतो काहीतरी.
नमस्कार गडकरी.

kandapohe | 25 मार्च, 2009 - 12:29 नवीन
कपाळावर हात मारणारी बाहुली>>>
मोदक देतानाची बाहुली.
कुलदिप्या, माठ्या >>>

gajanandesai | 25 मार्च, 2009 - 12:30 नवीन
साजिरा, 'काय वाट्टेल ते बडबडून' घ्यायला ते मुहूर्त शोधत बसत नाहीत.

kuldeep1312 | 25 मार्च, 2009 - 12:35 नवीन
@ जी. डी.
तुझी स्वाक्षरी ही तुझ्या कोणत्या शोधनिबंधाच्या >> कसला डोंबलाचा शोधनिबंध आणि प्रबंधाचा सारांश
अहो mba campus ला आलेले चांगले (चांगले ह्यासाठी की हे आत्ताच लवकर कळल अन् वाईट ह्यासाठी की पुढे ही असच होणार आहे ह्याची खात्री पटली)वाईट अनुभवांचा हा परिपाक आहे हा! ह्यावर जो कोणी महामुर्ख शोधनिबंधाच्या प्रबंधाचा सारांश लिहिल त्याला आयुष्यात कधीच पी. एच. डी मिळणार नाही पण जर ती मुलगी असेल तर रेकॉर्ड टाईममध्ये तिला डिग्री प्राप्त होईल!
@ पूनम
चांगलं गंडवतोस हां!>> आयला खरच नको का येऊ मी? इथेही??? म्हणजे जाएं तो जाएं कहाँ अस म्हणत फिराव लागेल मला एवढ निर्दयी कस होता येत तुला?
*********************
"जसं शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरावे तसच अनुल्लेख हे ही शस्त्र आहे आणि ते जास्त परिणामकारक आहे"

*****************************************************************************
हा वरचा मायबोलीवरचा आजचा संवाद! :)

तर मंडळी,

मुली डम्ब असतात अन् मुलं हुशार! (वयोगटाची अट नाही!) पण आता कळून चुकलय की अस नसत! मुलीच हुशार असतात अन् मुलं डम्ब, माठ असतात! हा मी मांडलेला हायपोथिसस सप्रमाण सिद्ध झालाय कसा काय हे आता पुढच्या पोस्टमध्ये!


जास्वंदीचा ब्लॉग वाचून आय मीन ऐकून मी इतका इम्प्रेस झालोय की ह्याच (नावात काय आहे? ) मुलीला माझाही गाण्यांचा ब्लॉग काढायच काम बहाल करावं अस माझ्या मनात आलय. आता मुळातच माझा ब्लॉग काढण्याच काम आऊटसोर्स का करायच असला प्रश्न पडता कामा नये आणि जर पडलाच तर कारणं देतोय आधीच:
१)माझ्या अंगात ठासून भरलेला आळशीपणा हे एक सर्वात महत्वाच कारण.
२)"डेलीगेशन ऑफ वर्क" वर माझा असलेला विश्वास.
३)"योग्य व्यक्ती योग्य कामावर"
४)"नुसताच आवडीच्या गाण्यांचा ब्लॉग काढला आणि काय बोलाव असा विचार करत बसलो तर दोन शक्यता निर्माण होतातः
अ] मी काहीही न बोलता संपूर्ण गाणं ऐकत राहीन अगदी तल्लीन होऊन
ब] मी अखंड बडबड करीन आणि शेवटी गाणं काय तुम्हाला ऐकायला मिळणार नाहीच.

तर ह्या दोन्ही शक्यता ध्यानात घेऊन शिकाऊ लोकांना काम देण्यातच अस्मादिक धन्यता मानतील.

हां तर ब्लॉगच नाव असेल: "मेरीभी कहानी गानोंकी जुबानी! [संपूर्णतः ढापलेल! ;) धन्स जास्वंदी :) ]

पहिल गाण असेल: "व्हेन यु लव्ह समवन" ब्रायन अडम्स (adams!!! can't write in marathi)

ciao.

Tuesday, March 3, 2009

माझे नसते उपद्व्याप>>

माझे नसते उपद्व्याप>>

विकांताचा पहिला दिवस: शनिवार २८/०२/२००९ वेळ निवांत सकाळ १०:०० वा.
[सकाळी (भल्या पहाटे ७:०० वा.) आई नं ऑफीसला जाताना सांगितल होत की आज कामाला बाई येणार नाही तेंव्हा कपडे कमी टाक! आणि अस्मादिक नेमके त्याच वेळेला कसल्या तंद्रीत होते कुणास ठाऊक?] "अमृततुल्य चहाचे" केवळ दोन प्याले (म्हणजे मग!!) रिचवून आम्ही नेमके त्याच दिवशी अंगात व्यवस्थित मुरलेला आळशीपणा झटकून कामास लागलो होतो अन् (कधी नव्हे ते काम करतो हा आरोप खोटा ठरवणार असा दृढ निश्चय करून) झटपट कामं (गाडी धुणं अवघ्या १५ मिनिटात!) उरकताना वापरलेले डस्टर अन् इतर कव्हर्स वगैरे व्यवस्थित सर्फ एक्सेलचे फक्त २ मोठे चमचे वापरून छान बुडवून काढले. तिथे असलेला कपड्यांचा ढीग पाहून मनाशी विचार केला की आज आई अन् बाईंना चकीत करूया. मग काय अतिशय उत्साहात ते सारे कपडे दोन बालद्या/ड्या (?) पाण्यात मुबलक प्रमाणात साबणाचा फेस करून बुडवले ( मनाशी विचार हाच की आज संध्याकाळी आईला मी सांगू शकीन की रोज प्रमाणेच आजही (विकांत हा माझ्या लोळण्याचा/ वाचण्याचा अन् केवळ भटकण्याचा हक्काचा दिवस!) मी हे काम केलेल आहे!

वेळ १२:०० वा.

मिसळ खाऊन स्वारी घरी परतली अन् परत एकदा "चा" तल्लफ आल्याने तडक स्वयपाक घरात शिरली चहाच भांड काही के ल्या मिळेना तेंव्हा कॉफीच भांड काढून चा ची तहान कॉफीवर भागवली. तेंव्हाच एक गोष्ट माझ्या ध्यानात आली की शनिवारी फारच लवकर म्हणजे साधारण ८:३०वा काम करायला येणारी बाई आज १२:३० झाले तरीही आलेली नाही! पण ट्युब लवकर पेटली नाही त्यांच्या घरी फोन केला तो कोणी उचलेना मग विचार केला की कोणाकडे तरी कामाला गेली असेल येईल तासाभरात!
तेवढ्यात फोन वाजला: पलीकडून नेहमीप्रमाणे हुकुम "दिल्ली ६" ची तिकीट काढली आहेत २:०० पर्यंत घरी ये एकत्रच जाऊ.

मी: ओ. के. मी आलोच जेवायच काय? मला फार भूक नाहीये पण खाईन थोडसं
ती(मैत्रीण): अरे मग आत्ताच ये ना घरी मी ना आज उंधीयो बनवायचा प्रयत्न केला आहे टेस्ट कर!
मी: [मनात अरे देवा कुठुन जेवायचा विषय काढला आता माझ्यावर प्रयोग ]
प्रकट अगं नको खरच नको अजून आमची कामवाली बाई ही आलेली नाही शिवाय आईचा फोन येणार आहे दुपारी (हे मात्र साफ खोटं)
ती: अरे किल्ली शेजारी ठेव नं अन् आई काय मोबाईलवरही फोन करेल आता बाकी काही कारण न सांगता ताबडतोब इकडे ये!
मी: उम्म्म.... **** अगं पण......*****
ती: तू फक्त एवढच सांग येतोयस की नाही?
मी: (दुसरा काहीही पर्याय नसल्याने) आलोच १० मिनिटात

वेळ१:३० वा. मैत्रिणीच घर:

मी: उंधियो नामक पदार्थ घशाखाली ढकलत आणि त्या पदार्थाची कृती ऐकत बसलो होतो
ती: अरे घे नं अजून खूप आहे!
मी: अगं आई बाबांना ठेव त्यांनाही आवडेल (कदाचित)
ती: अरे ते कालच गेलेत पुण्यात आता हे सगळ मी, तू, अन् अजुन ४/५ जणांसाठीच!
मी: व्वा खरच ( मनात बोंबला!!! आता हे सार पर्यायाने मला एकट्यालाच खायला लागणार तर )

वेळ २:००

परत एकदा अमृततुल्य चा चे घोट रिचवत एक एक करत आम्ही सारे फायनली निघालो!

थिएटरात: २:२०
आज पर्यंत कधीही कुठल्याही पिक्चरला सुरवातीची किमान २० मिनीट आम्ही चुकवली नाहीत असं कधीही झालेल नाहीये!! अन् आज मात्र फक्त त्या भिकारड्या
अभिषेकला बघण्यासाठी माझ्या गृप मधल्या ४ मुली पागल झाल्या होत्या.

तर आज पहिल्यांदाच पिक्चर सुरूवातीपासून पाहिला! का पाहिला असच वाटत होत. पण उघडपणे तस न बोलता मध्यंतरापर्यंत मी जागाच होतो नंतर मात्र मी मस्त पैकी झोपलो! यथावकाश पिक्चर संपवून बाहेर पडलो तर "अभ्याच्या" अतिउत्साही पंख्यांनी काय दिसलाय तो नं वगैरे चालू केल... मला ही ह्या चर्चेत सामिल करण्याचा दोन वेळा विफल प्रयत्न झाला मी मात्र नुसतच हो ला हो म्हणत गेलो! आणी तिथच फसलो सिनेमाशी रिलेटेड काही प्रश्नांची उत्तरे देऊ न शकल्याने माझ्या नालायक मैत्रीणींनी आईसक्रीमच बिल माझ्यावर फाडल!!

शेवटी असच मजल दरमजल करीत एकेकाला सोडत मी विकांत स्पेशल म्हणून कट्ट्ट्या वर जाणार इतक्यात आईचा फोन आला..
आई: मला यायला उशीर होईल तर जरा भाजी वगैरे आणून घे तिची लिस्ट वाढतच होती
मी: अगं पण आपल्या काकू आणतीलच की हे सगळं
आई: सकाळीच सांगितल होत नं तुला तुझ लक्ष कुठे असत?? आज त्या येणार नाहीत आता आपण घरी काय काय पराक्रम केले आहेत ते सांगा!
मी: छे काहीच नाही गं मी आत्ता घरीच जातोय
आई: हो का? पिक्चर बघून नं?
मी: म्हणजे तुला फोन झाला पण?
आई: हो सोन्या आता एक कर जरा घर नीट आवर उद्या आपण साफ सफाई करू
मी: अ गं आज मी रात्री नाहीये घरी
आई: ते बघू मी आल्यानंतर

७:३० वाजता मी घरी आलो अन् बाथरूममध्ये हा कपड्यांचा ढीग बघून वैतागलो होतो! पण काय करणार आता? मला हे सारे कपडे धुतल्या शिवाय बाहेर जाण शक्यच नव्हतं :(

मग काय आलिया भोगासी असावे सादर अस म्हणत मी ते कपडे चोळण्याचा, पिळण्याचा निश्फळ प्रयत्न केला! इतर कपड्यांना माझ्या रेड कलरच्या टी शर्टचा कलर लागला होता. [आईला काय उत्तर द्यायच? ह्याचा मी लगेच विचार केला>> आता काय "होळीच्यासाठीचे" असे वेगळे कपडे काढण्याची गरज नाही... मी मनातल्या मनात ठरवल!] जवळ जवळ तासभर हा कपडे धुलाईचा कार्यक्रम उरकल्यावर माझं कंबरड मोडल होत.

आईला सविस्तर कथा सांगितल्यावर महतप्रयत्साने मला रात्री मित्राकडे जायची परवानगी मिळाली ती एकाच अटीवर की: आत्ता लगेच बाजारातून अमुक अमुक वस्तू आणून दे... लिस्ट फारच मोठी आहे पण त्यात "गुलाबजामचा खवा" असा पदार्थ पाहून मी अत्यानंदाने तयार झालो अन् निघालो.. >>घरी सामान देतो न देतो तर तर अचानक आई कडाडली अरे सोन्या काय आणलयस हे तू? (आई प्रेमाने मला बरच काही म्हणते त्यातलच हे एक विशेषण! सोन्या)
मी: काय झालय? तू सांगितलेल सगळं आणून दिलय एक तर बाहेर एवढी गर्दी की गाडी पार्क करायला जागा नाही त्यात हे सगळ आणल तर तू लगेच तोफखाना चालू केलास?
आई: मी गुलाबजामचा खवा सांगितला होता!
मी मग?
आई: तो न आणता तू हा साधा खवा काय आणलास?
मी: हे बघ त्याला लिस्ट दिली आणि मी पेट्रोल भरायला गेलो होतो आता मला काय ठाऊक त्यान कुठचा खवा दिलाय ते?
आई: ते काही मला सांगू नकोस ताबडतोब जा आणि गुलाब जामचा खवा घेऊन ये
[मी कुणाच काय वाईट केलय की आज अस सगळं होतय? असच काहीस पुटपुटत मी खाली उतरलो तेवढ्यात फोन वाजला... माझा मित्र... अरे श्री पडलाय बाईकवरून..आज रात्री त्याच्याकडे जाऊया!
मी: ठीक आहे मला उशीर होईल तो कसा आहे
मित्र: ठीक आहे आता...
मी: ओ.के. आपण रात्री भेटूच.

बाकीची काम करून रात्री १०:३० च्या सुमारास मी श्रीकडे पोहचलो
कसा धडपडला आणि कितपत लागलय ह्याची चर्चा करता करता आम्ही कॉफी घेतली अन् गप्पा मारत लोळत पडलो होतो. साधारणतः १ च्या सुमारास खूप भूक लागली होती आधीच आम्ही असेल नसेल ते सगळं संपवल होत मग आता काय करायच असा विचार करत असताना मला चक्क मॅगीची दोन पाकीट दिसली मग काय मी "साग्रसंगीत मॅगी" करायला कांदे, बटाटे शोधायला लागलो. [ह्या आधी पोहे करून पाहिले असल्याने मॅगीही तशीच करू शकतो असा (अति) आत्मविश्वास मला होता.

अन् नेमका ह्याच गोष्टीला म्हणजे माझ्या साग्रसंगीत मॅगीला मित्रांनी विरोध केला
कारण त्यांना नुसतच मॅगी खायच होत. पण मी सगळं करतो अस म्हटल्यामुळे त्यांचा विरोध थोडा कमी झाला होता
मी "साग्रसंगीत मॅगी" ची जय्यत तयारी केली ४कांदे, ५-६ बटाटे चिरून फोडणी करू लागलो होतो! ह्या सगळ्या नादात मित्राने दुसर्या भांड्यात पाण्यात ठेवलेल्या मॅगीचा पार लगदा झाला होता (ही गोष्ट माझ्या फारच उशीरा लक्षात आली :( )
तो पर्यंत फोडणी देऊन झालेली होती दुसरा मार्गच नसल्याने मी मोठ्या कढईत मॅगीचा लगदा टाकला व परतला!! बराच वेळ झाल्याने मित्र वैतागले होते शेवटी मीही कंटाळलो होतो. ते तसलच मॅगी खायला दिल्यावर सगळ्यांनी बुकलून काढल. शेवटी थोडीफार स्तुती करत सगळ्यांनी ते "मॅगी" संपवले तरी शेवटी मला ऐकाव लागलच की आज तू नक्की काय केल होतस हे? मॅगी की मुगाची खिचडी????

मी: (काय बोलणार?) :(
*********************************************
रविवार सकाळ>>
तर अश्या प्रकारे तो २४ तासांचा एक महाउपदव्यापी दिवस संपला आणि सकाळी घरी आलो नेमक तेंव्हाच बहिणाबाईंनी मला सांगायला सुरूवात केली की अरे मी परवा विचारत होते नं की पश्चाताप, पश्चातापाची भावना ह्याला इंग्रजी शब्द काय तो असा आहे:

पश्चाताप : repentance, penitence, remorse, regret, contrition, ruefulness
पश्चातापाची भावना: A feeling of remorse
पश्चाताप वाटणे: To repeht (of)
पश्चातापद्ग्ध : repentant, penitent, remorseful

मी: ए गपे!! मी तुला विचारलय का? का सकाळी सकाळी त्रास देत्येस?

बहिणाबाई: आयला माझ्यावर का उखडतोयस?? तरी काल सांगितल होत की कपडे बुडवू नकोस

( मी मनातल्या मनात १ ते १०० आकडे मोजत बसलो... पश्चाताप होईल असाच हा विकांत होता... :( पण आता काय उपयोग?)





Donnn Complain ... Either Do Something About it or Shut-Up !!! ;)