२४ जून २००९.
डिस्केलमर्स >>>>
हे एका दमात लिहिलेलं आहे सो आवडलं नाही तर सोडून द्या ! (अर्थात आवडेल का? का आवडावं? साहित्यिक मूल्य वगैरे असं काहीही नसणार आहे यात.) आवडावसं काहीही नसेल ही कदाचित पण जो भी लिखा है दिल से लिखा है! सो आवडेल अशी आशा (मी बाळगून आहे).
लिहिलेल सारं खरच आहे असे मुळीच नाही म्हणणार पण सारेच कल्पनेतल आहे असंही नाही कसं आहे जे जे कल्पनेत येत असतना ते ते कधीनाकधी तरी कुठेनाकुठेना कुठेतरी घडलेल असतं अनुभवलेल असतं, घडलेल असत अथवा घडायचच असतं! :)
******************************
ए तर प्रेम म्हणजे नक्की काय?
तुला काय डेफिनेशन हव्ये का प्रेमाची?
नाही अगदी डिफाईन करायची गरज नाही पण नक्की काय असतं प्रेम म्हणजे?
म्हणजे माणूस प्रेमात पडतो असं का म्हणतात?
काय?
म्हणजे प्रेमात पडतो का?
कारण मोस्टली पडतात उभे राहत नाहीत म्हणून :)
पीजे!!
ओह्ह ओके थांब एक मिनिट!!
Love is an extremely powerful emotion; it can be irresistible and people are often bound to pursue their love interests. झाल का समाधान??
हॅ अरे ही तर विकी. वरून ढापलेली डेफिनेशन आहे.
आता डेफीनेशन सांगितली तरी प्रॉब्लेम...
अरे माणूस प्रेमात पडतो असं का म्हणतात? पडतो हे जरा ऑड वाटत!
ह्म्म्म बरं ऐक.. Snorkeling in a lagoon is more pleasing than seeing it from a glider....
हे पण ढापूगिरी करून सांगतोयस ना?
अगं ढापूगिरी काय अनुभव वेग वेगळा असतो. म्हणतात ना प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...
हाहाहा मला माहिती आहे ते!
मग मला विचारायच प्रयोजन काय?
एवीतेवी स्वत:च "ग्यान" पाजळत असतोस ना माझ्यापुढे एवढं साधं नाही का सांगता येत? सरळ कबुल कर ना नाही येत सांगता म्हणून..
हं कबुल नाही येत मला!
हाहा बरं मग मी सांगते तुला प्रेम म्हणजे काय असत ते ओके?
ओके बाई साहेब तुम्हीच सांगा आता
सांगते पण आधी माझ्या प्रश्नाच उत्तर दे नीट विचार करून
हं विचारा
तू कधी प्रेम केलयस का कुणावर?
हॅ!!! मी??? अगं मला वेळच कुठे आहे प्रेम करायला?
हेहेहे प्रेम काय वेळ पाहून करायच असतं का? आखून प्लॅन करून का कधी कुणी प्रेमात पडतं? आणि म्हणून तर म्हणतात माणूस प्रेमात पडतो. प्लॅन करून नाही बरं का कुणी प्रेमात पडत...
हं हो का? असेल असेल...
असेल नाही असच असतं.. सहवासाने प्रेम वाढतं.
पण ते कुणाच्याही सहवासात राहून वाढतं काय?
हाहाहा नाही आता मला सांग तू म्हणतोस की तू प्रेमात पडला नाहीस कारण तुला वेळ नाही. मग मला सांग आपला सहवास जास्त आहे पण तू काय माझ्या प्रेमात आहेस का?
...
...
ह्म्म्म बरं ठीके ऐक आता एक गोष्ट...
ओके सांग.
******************************
सालं प्रेम ... म्हणजे काय नक्की? ह्याचा पत्ताही नसताना ते प्रेमात पडले (आय डाऊट की ते दोघेही प्रेमात होते कारण तो डेफिनेटली प्रेमात होता पण तिच्याबद्दल नाही सांगता येणार आत्ता आणि तेंव्हाही कुठे सांगता येणार होत?) नुकतच कॉलेजमध्ये फेस्टिवल सीझन चालू होता आणि नाटक बसवायच होत व्हर्सिटी लेव्हलवर... आणि मग ओळख झाली त्यांची. तो हिरो होता नाटकातला आणि ती हिरॉईन... नाटकाची प्रॅक्टीस जोरदार चालू होती.
नाटकाच नाव काय रे?
लव्हगेम ४० - ०!!!
रात्री उशीरापर्यंत प्रॅक्टीस चालायची. आणि कसं काय माहित नाही पण तो फारच इनव्हॉल होत गेला भुमिका जगणं म्हणजे नक्की काय ते नाही माहिती पण तो ही भुमिका अतिशय समरसून करत होता (अर्थात त्याला कारणही तसंच होतं नाटकात प्रेम दाखवलं होत त्यांच्यादोघांच्यात आणि मे बी त्याला वाटत होतं की हेच रिअल लाईफ मध्येही चालू आहे. पण नाही तसं ते नव्हतचं कधी अर्थात त्याला हे शेवटपर्यंत जाणवलच नाही.) भुमिकेच्याबाबतीत दिग्दर्शक आणि इतर कास्टलाही तो एकदम परफेक्टच वाटतं होता. आणि त्याला ती परफेक्ट वाटत होती... डायलॉग म्हणताना, बोलताना, हसताना अगदी रडण्याच्या सीनमध्येही ती एकदम परफेक्ट होती. इतकी की त्या शेवटच्या सीनला त्याच्या डोळ्यातूनच पाणी आलं होतं अॅक्च्युली ती सोडून जाते त्याला असं काहीसा सीन होता तो...
आणि व्हर्सिटी लेव्हलवर नाटक स्पर्धा सुद्धा जिंकले सलग दोन वर्ष!
******************************
कॉलेजची टेनीस चँम्प होती ती दोघं! अन् ह्या वर्षी मिक्स डबल्स मध्ये ही पार्टीसिपेट करायच म्हणून दोघं एकत्र खेळणार अशी चर्चा होती...
अन् त्यांनी फायनल मिक्स डबल्स ही जिंकुन दिली पहिल्यांदाच कॉलेजला!!!
सलग पुढची दोन वर्ष ते दोघं एकत्र खेळले आणि ४ चँम्पियनशिप्स जिंकले एकत्र!
त्याचा मुळातच प्रेमाबिमावर विश्वास नव्हता! तो फार प्रॅक्टिकल होता नात्यांच्या बाबतीत.
अन् ती टिपीकल रोमँटिक!!
तर अश्या भेटीगाठी होत गेल्या सीसीडी, बरिस्ता अन् मग हळूहळू ट्रेक्स, एक्सप्रेसवेवर लाँगड्राईव्ह...
ह्म्म्म मग?
मग काय तिला जायच होत युकेत पुढं शिकायला आणि बाबांचा बिझनेस जॉईन करायचा होता.. तिनं जायच ठरवल!
आणि त्याला शिकवायच होतं खेड्यात जाऊन! स्वत:च धंदा सुरू करायचा होता.
म्हणून त्या दोघांनी ठरवल की स्वतःच्या महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी दोघांनीही काही वेळ द्यावा अन् मग ठरवायच की पुढे काय करायच ते..
म्हणजे लग्न कधी करायच तेच ना?
हो बोलले नाहीत दोघं कधीही स्पष्ट पण दोघांच्याही मनात तेच होत..
बरं मग?
मग काय ती निघून गेली युकेत पुढच्या शिक्षणसाठी आणि मग २ वर्षांनी परत आली बिझनेस जॉईन करायचा म्हणून आणि अशी साधारण एक ५ वर्ष झाली तिचा बिझनेसचा व्याप प्रचंड होता
पण ह्या काळात एकदाही त्यांची भेट कशी नाही झाली?
नाही झाली फोन वरून बोलणं मात्र झालं
त्याने शाळेत शिकवलं ३ वर्ष आणि साईड बाय साईड गॅरेज ही चालूच होतं आणि आता त्याने गाडीच्या बॅटरीज अन् टायर्स बनवण्याच्या फॅक्टरीज काढल्या एकंदर धंदा जोरात सुरू होता...
ह्म्म्म मग
मग काय एकदा त्याला बोलावण आलं तिच्या लग्नाच! अन् तो गेला एक कलकत्ता सिल्क आणि छानसं गिफ्ट घेऊन!
आयला असं कसं काय?
आल असच! मे बी ह्यालाच म्हणतात लव्हगेम! She won 40 – 0!!
मग?
मग काय? संपली गोष्ट!
******************************
अरे पण ह्यात Happy ending कुठाय?
अगं प्रत्येक गोष्टीला Happy ending असायलाच पाहिजे का?
होच मुळी!! अगर Happy ending नहीं तो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!!
हाहाहा असं कोण म्हणतं?
शारूकखान!
नाही त्याला डायरेक्टर तश्या लाईन्स म्हणायला सांगतो पिक्चरमध्ये आणि रिअल लाईफ मध्ये डायलॉग्स नसतात आणि Happy ending पण!
******************************
"The opinions expressed herein are not necessarily those of my employer, not necessarily mine, and probably not necessary!!" :)
3 weeks ago
7 comments:
Hi,
Good one :)
Hey Rohini Thanks! :)
You in HR? Which profile?
Good one !!!
Thanks Shardul.
:) :) आवडलं!!
Sarwana punha ekda dhnywaad!
Sakhee kaay aawdle nakki? this is not the fair/ good end! this is kinda TATATUT :D
अरे लिहिलंय ते एकंदर सगळेच आवडले :)
मी फक्त शेवटाबद्दल लिहिलं नाही.
Post a Comment