आज हे गाणं ऐकलं अन् ही जुनीच पोस्ट आज पब्लीश करतोय...
ना है ये पाना...
ना खोना ही है...
तेरा ना होना जाने क्यों होना ही है|
तुमसे ही दिन होता है...
सुरमई श्याम आती है...
तुमसे ही तुमसे ही...
जब वी मेट मधलं तुमसे ही ऐकलं आज परत एकदा त्यानं.. एफेम ऑन होता आणि आज त्यानं चॅनेल चेंज नाही केलं... जेंव्हा पासून पिक्चर बघितला होता तेंव्हा ही अस्सच वेड लावलं होतं त्या गाण्यानं.. अन् ते गाण्याचच शब्दांचच नुस्तं वेड नव्हतं ह्याची खात्री त्याला नंतर पटली. अद्दभूत रसायन होतं ती म्हणजे. पहिल्यांदा जेंव्हा पिक्चर बघायचा ठरलं होतं तेंव्हा हार्डली चार जण येणार होती. हो नाही करत तीही आली. ह्या आधी त्यानं कॉलेजमधल्या ग्रूपबरोबर चक दे बघितला होता तेंव्हा काही विशेष जाणवलं नाही. तेंव्हा ती भरभरून त्याच्याच विषयी बोलत होतीं काय काय सांगत होती.. आणि तो नुस्तं ऐकत होता.
आय अॅम नॉट शूअर. माझं जब वी मेट मधल्या करिना सारखं आहे आय डोन्ट नो व्हॉट ही इज थिंकींग..
तुला माहित नाही? हाहा की तुला ते त्याच्याकडून बोलून हवय? तूच का नाही विचारत त्याला?
त्या वेळी ती म्हणाली जोवर तो विचारत नाही तोवर काय फायदा? मी नाही विचारणार.
अन् आज जब वी मेट बघून सीसीडीत बसले असताना मैत्रिणीने अचानक विचारलं अचानक नव्हतच खरं तर पूर्ण कॉलेजला ते माहित होतं.. तुला ती आवडते ना? पहिल्यांदा त्यानं नाही म्हटलं. हँ काहीतरीच काय तिला गौरव आवडतो ना? मैत्रिण म्हणाली मी तुला ती आवडते ना असं विचारलय ना?? मग तो म्हणाला खरंच नाही गं... कसं शक्य आहे हे?
आवडणं न आवडणं ह्यात अशक्य काय? यू गाईज हॅव द केमिस्ट्री.. बट इट्स अ बीट लेट आय थिंक. हे खरंच आहे तू मान अथवा न मान! पण एक करच विचार तिला.
काय वेडी आहेस का? काहीही काय? मी नाही विचारणार आज.
मी आज नाही म्हटलंय पण विचार कारण यू विल गेट द स्ट्रेट आन्सर विच यू नीड नाऊ.
खर तर लास्ट सेम नंतर विचारू. बघू असा विचार केला त्यानं आणि तेवढ्या पुरता तो प्रश्न मनाच्या कप्प्यात खोल कुठेतरी दडवून ठेवला.
ह्या सगळ्याचा विचार बंद केला अन् सेमिस्टर एक्सामवर लक्ष केंद्रीत केलं. पण कसं काय माहित नाही अभ्यासावर अन् तब्येतीवर परिणाम होत होता. क्लासमध्ये ३ डिबेट सेशन्स मध्ये त्यानं मुद्दामून पार्टिसिपेट नव्हतं केलं. काय करावं कळत नव्हतं. मैत्रिणीचा सल्ला मानावासा वाटला. तेंव्हा तिनं परत एकदा सांगितलं तेंव्हा विचारलं असतस तर...
ह्म्म्म नाही विचारलंस खरं आहे! पण आत्ता आजच विचार काय होईल फार फार तर नाही म्हणेल ना? चालेल. आणि एक ऐक. आय नो यू विल फाईन्ड इट डिफिकल्ट टू डायजेस्ट इफ द आन्सर इज नो स्टील यू ओन्ली हॅव टू डील विथ इट.
मग काय त्यानं विचारलं.. तिनं नाही नाही म्हटलं ती म्हणाली तुला माहित्ये ना?
ह्म्म्म्म हो फरगेट इट! आय जस्ट वॉन्टेड टू से इट... आणि तो पुढचा क्षणभरही न थांबता निघून गेला तिथून.
***
दोन वर्षांनी एका क्लायन्टच्या ऑफिसात गेला होता बघतो तर काय समोर साक्षात ही उभी!लेट होतोय फारच निघतो नंतर बोलू असं बोलून निघाला खरा. नंतर त्याच्या लक्षात आलं की फारच जुजबी बोलणं झालं. क्लायन्ट मीटींग लांबली होती दुपारभर. तिकडून निघताना संध्याकाळ झाली.. गाडी पार्किंग मधून काढली खरी अन् त्याचा फोन वाजला. तिनंच केला होता. त्याला खरतर गोंधळल्यासारखं झालं काय करावं असं म्हणत फोन घ्यावा की नाही ह्या विचारात तो कट झाला. अन् एसेमेस आला. इथंच असशील तर कॅम्पस बाहेर ये. सीसीडीत भेटूयात का?
नेहमीप्रमाणं ती बोलत होती अन् तो ऐकत राहिला..
सीसीडीतून निघून तिला घरी सोडताना जब वी मेट मधलं गाणं लागलं होतं..
तुमसे ही दिन होता है...
सुरमई श्याम आती है...
तुमसे ही तुमसे ही...
हर घडी सास आती है...
जिंदगी कहलाती है...
तुमसे ही तुमसे ही...
ना है ये पाना...
ना खोना ही है...
तेरा ना होना जाने क्यों होना ही है|
अन् आज त्याला ते चेंज करावस वाटतच नव्हतं. तिला नाना चौकात सोडलं. गौरवशी थोडावेळ बोलून तो निघाला.. निघताना म्हणाला तिला यू बोथ लूक गूड टूगेदर :) आय लाईक द वे यू स्टॅन्ड विथ हिम :)
अन् आत्ता गाडीत तो ते गाणं शोधत होता कुठेच सापडत नव्हतं.. शेवटी एफेम ऑन केला अन् रिक्वेस्ट अवर मध्ये ते गाणं लावलं होतं.. आरजे सांगत होती ये फर्माइश की है नेहाने गौरव के लिए...
3 weeks ago
7 comments:
Chaan aahe....
thanks Miathili :D
march 2009 nantr ekdam jan 2010 madhye post taklies theekay lage rahio :P
आवडली! :) छान जमलीये!
Hey superb blog! Does running a blog similar to this require a large amount of work?
I've very little understanding of coding but I had been hoping to start my own blog in the near future. Anyhow, if you have any ideas or techniques for new blog owners please share. I understand this is off subject nevertheless I simply wanted to ask. Thank you!
Look into my site ... buying a car
Look at my web page ... buying a car with bad credit,buy a car with bad credit,how to buy a car with bad credit,buying a car,buy a car,how to buy a car
Wow, marvelous weblog structure! How long have you been blogging for?
you make running a blog glance easy. The entire glance of your web site is great,
let alone the content!
My webpage buying a car
Feel free to surf my web site ; buying a car with bad credit,buy a car with bad credit,how to buy a car with bad credit,buying a car,buy a car,how to buy a car
Thanks a bunch for sharing this with all people you really recognise what you are talking about!
Bookmarked. Kindly also discuss with my web site =). We
can have a link alternate arrangement between us
my site; how to get pregnant fast
किती सुंदर लिहिलंय, छानच
Warm Regards
Agreen Hotels - Amazing Resorts near Pune
Beautiful Koyna Lake Resorts
Post a Comment