Friday, May 30, 2008

१ इनोदी सुंदर स प ना!!

१ इनोदी सुंदर स प ना!!
माझ्या माय बोलीवरील सर्व मित्र/ मैत्रिणींना अन त्यांच्या सर्व मित्र/ मैत्रिणींना सप्रेम नमस्कार! माझे हे माय बोलीवरील पहिलेच (इ नो दी ही) लिखाण असुन सदर लिखाण इनोदी न वाट्ल्यास व्यवस्थापक महाशय योग्य तो निकाल लावतीलच :) तत्पुरवी आपण हे वाचुन ह्या पामरास प्रोत्साहन द्यावे अशी नम्र सुचना!! :) [ म्ह्न्जे विनंती! ]
तर कालच रात्री मी विचार (^-^) करीत असताना ही कथा मला सुचली ती थोडक्यात अशी:
भाग १ :
वेळ : ५:०० - पुण्यनगरीतील १ रम्य सन्ध्याकाळ!
स्थळ (म्ह्न्जे जागा बरका!!)
हिंजवडी - [पा त्र १] सुंदर नावाचा सुंदर तरुण ( खर तर तरुणीच सुंदर पाहीजे पण इथे इलाज नाही!) १आ semi –govt. IT [I= इथुन. T=तिथुन कामं मिळवणारया!! :)] company तुन नुकताच बाहेर पडतो अन चटकन स्व:ताच्या kinaietic zing [ = काही नाही ठीक त री ही तु झिंग! :) ] kick मारायचा असफल प्रयत्न करतो, इतक्यात एक[पा त्र २] इनोदी मुलगी येते अन त्याला सांगते की ही माझी गाडी[पुणेरी लोक स्कुटीलाही गाडी म्हणतात! :) ] आहे! मग तो ओशाळतो अन त्याला त्याची चूक उमगते - त्याच्या गाडीचा रंग अन् तिचा I mean गाडीचा एक सारखाच असल्याने ही फसगत होते. तो पटकन apologetic tone मध्ये sorry म्हणुन चटकन तिथुन निघतो...
हिंजवडी > > कोथरुड ... मजल दर मजल करत तो घरी पोहचतो तर नेहमी प्रमाणे [पा त्र ३] राहुल [त्याचा बंगळुरु हुन आणलेला सेवक / गडी/ चाकर/चालक (गाडीचा!) आणिक बरच काही...] त्याला आलं घातलेला चहा पाजतो, अन् म्हणतो साहेब आज मला गावी (बंगळुरु) गेलेच पाहीजे कारण माझा आधीचा मालक मल्या अचानक खूप आजारी पडला आहे आणी... सुंदर त्याला लगेचच परवानगी देतो व सांगतो की बंगळुरुत मुकेस नावाचा (नावाचा) डॉक. आहे त्याला भेट!....
वेळ : ८:०० - पुण्यनगरीतील १ अरम्य रात्र!
इकडे हा (म्हनजे आपला सुंदर) वरण भाताचा कुकर लावतो. एकीकडे कणीक मळुन पोळ्या करायला लागतो दुसरीकडे कांदे चिरुन फोडणीला टाकतो... साग्र संगीत कांदे बटाटे काच र्‍ या करुन चटणी ( पाट्यावर) वाटतो. .... जेवण तयार करुन हा टी. व्ही. वर खाना खजाना बघत असतो इतक्यात......बेल वाजते!
वेळ : १०:०० [पा त्र ४] सपना एका हातात laptop दुस र्‍ या हातात bag घेउन घरात शिरते... आल्या आल्या टी. व्ही. वर खाना खजाना बघुन तिचं डोकं सटकत ती ताबडतोब remote हातात घेउन CNBC TV 18 / BBC / CNN/ INB/ NDTV अशी channels change करीत बसते.एकीकडे ती आपल्या कपाटातुन ५५५ काढुन १ जोरदार puff मारते. चल गं आता जेवुन घे असं तो म्हणताच ती खेकसतेच " ही काय जेवायची वेळ आहे का?? जा लवकर सोडा आणी shark tooth [vodka दारुचा १ उत्तम प्रकार] घेउन ये आणी हो काहीतरी तोंडात टाकायला ही आण... हा बिचारा काय करणार (बोलणार.. काय बिशाद??) मग आरामात रात्री ११:३० च्या सुमाराला ती जेवायला बसते नंतर हा सगळं आवरुन जेवुन घेतो
भाग २ :वेळ : १२:००
एका छोट्याश्या विश्रांती नंतर... तोवर आपण आपले (सु)विचार / प्रतिक्रिया मला पाठवु शकता : Kuldeep1312@gmail.com

No comments: