Saturday, October 31, 2009

डुटुडुडुटुडुडुटुडुडुटुडु

काय आता फार लिहिण्याची गरज नाही म्हणा... डोकोमोची ही अ‍ॅड पहा आणि एन्जॉय करा. आणि जमल्यास कुणीतरी मला जरा सांगा ह्या अ‍ॅड मध्ये डोकोमोSSS असं ओरडणारी ती बॉबकट असलेली मुलगी कोण? ओळखीची वाटत्ये पण आठवत नाहीये :( अ‍ॅड सहह्हीच आहे ह्या आधीची पण होती पण ती थोडी बायस्ड होती (अर्थात असं मला वाटलं म्हणून त्याबद्दल काही नाही लिहिलेलं इथं) फ्रेंडशिप एक्सप्रेस असलेल्या ट्रेनमध्ये लोकांच्या तोंडावरची माशीसुद्धा हलत नाही! (आता माशी नाहीये पण हा शब्दप्रयोग आहे म्हणून वापरलाय बादवे माशी सुद्धा न हलणे ह्याला काहीजण कोडगेपणा ही म्हणतात ;) ) फार लिहिलय का मी ओक्के थांबतो.

जाता जाता पुन्हा एकदा सानियाच्याच शब्दात...

"आपण ओळखीच्या माणसाकडे पाहून हसतो फक्त माणसांनाच हसता येते असं समजलं जातं...
हे असंच होत राहात अगदी ब्लॉगभारतीने (?) ही मागे एक इव्हेन्ट केला होता रस्त्यावर लोकांकडे बघून सहजपणे हसण्याचा त्याबाबत नंतर कधीतरी... आता थांबतो खरच :))))))))
डुटुडुडुटुडुडुटुडुडुटुडु डोकोमो डोडो कोको मोमो कोको मोमो



Saturday, October 3, 2009

ओळख पाळख वगैरे...

मंड्ळी काय लिहावं हा प्रश्न मला अजिबात पडलेला नाही! :-)
लिहिण्यासारखं बरेच आहे लिहिन लिहिन म्हणता म्हणता ते तसं झालेलचं नाही हे ही लक्षात आहे. काहीतरी लिहिलय ते पोस्ट करण्यासारख वाटत नाहीये म्हणून आणि एकंदरच ह्यावर लिहायची माझी जबरदस्त उर्मी मला आता थांबवू शकत नाहीये म्हणून ह्यावेळेस माझ्या अनेक आवडत्या उतार्‍यांपैकी लिहीन म्हणतो..


पुस्तक:प्रवास
लेखिका:सानिया
पान क्र.:१९
प्रकाशन गृह:राजहंस प्रकाशन



*****
मला काय वाटत ओळखीची, नेहमीच्या वापरातली माणसं वापरातली? होय होय वापरातली ज्यांचा आपल्याला उपयोग आहे, होतोय, पुढेही करून घेता येईल, अश्याच माणसांबरोबर आपण संबंध सुरळीत ठेवू पाहतो नात्यातली माणसं जेवढी गरजेची तेवढी त्या नात्यांभोवतालची वीण घट्ट अन् कधीकधी असह्य करून टाकणारी... ही गरज जोवर दोघांनाही/ असते तोवरच हे संबंध सुरळीत आणि दोन्ही बाजूंनी जपून ठेवलेले असावेत असं का कुणास ठाऊक वाटून गेलं. ह्या नात्यांमध्ये गरज आणि विश्वासाचा तसा काही परस्परासंबंध असायलाच पाहिजे असं काही नाही... गरज असते विश्वास असतोच असं नाही! मग ही ओळखीची माणसं कधी अनोळखी, परकी वाटू लागतात ते समजतच नाही.

मुळातच आपण ह्या अश्या सगळ्या ओळखी, अनोळखी, रक्ताच्या नात्यातल्या आणि इतर लोकांशी गरज म्हणून संबंध राखून असतो. ह्या गरजांची रुपं अनेक असू शकतात शारिरीक, भावनिक, आर्थिक वगैरे वगैरे. ह्यातूनच मग आपण एकमेकांना घट्ट धरून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो कधीकधी सहजपणे तर कधी अगदी अट्टाहास धरतो. आणि मग ही गुंतागुंत वाढतच जाते. आणि आपण रस्त्यात दिसणार्‍या समोरच्या व्यक्तीला बघून हसायच विसरून जातो. आणि मग उरतो तो फक्त एक हिशोब! उपयोगमुल्य
*****