Saturday, October 3, 2009

ओळख पाळख वगैरे...

मंड्ळी काय लिहावं हा प्रश्न मला अजिबात पडलेला नाही! :-)
लिहिण्यासारखं बरेच आहे लिहिन लिहिन म्हणता म्हणता ते तसं झालेलचं नाही हे ही लक्षात आहे. काहीतरी लिहिलय ते पोस्ट करण्यासारख वाटत नाहीये म्हणून आणि एकंदरच ह्यावर लिहायची माझी जबरदस्त उर्मी मला आता थांबवू शकत नाहीये म्हणून ह्यावेळेस माझ्या अनेक आवडत्या उतार्‍यांपैकी लिहीन म्हणतो..


पुस्तक:प्रवास
लेखिका:सानिया
पान क्र.:१९
प्रकाशन गृह:राजहंस प्रकाशन*****
मला काय वाटत ओळखीची, नेहमीच्या वापरातली माणसं वापरातली? होय होय वापरातली ज्यांचा आपल्याला उपयोग आहे, होतोय, पुढेही करून घेता येईल, अश्याच माणसांबरोबर आपण संबंध सुरळीत ठेवू पाहतो नात्यातली माणसं जेवढी गरजेची तेवढी त्या नात्यांभोवतालची वीण घट्ट अन् कधीकधी असह्य करून टाकणारी... ही गरज जोवर दोघांनाही/ असते तोवरच हे संबंध सुरळीत आणि दोन्ही बाजूंनी जपून ठेवलेले असावेत असं का कुणास ठाऊक वाटून गेलं. ह्या नात्यांमध्ये गरज आणि विश्वासाचा तसा काही परस्परासंबंध असायलाच पाहिजे असं काही नाही... गरज असते विश्वास असतोच असं नाही! मग ही ओळखीची माणसं कधी अनोळखी, परकी वाटू लागतात ते समजतच नाही.

मुळातच आपण ह्या अश्या सगळ्या ओळखी, अनोळखी, रक्ताच्या नात्यातल्या आणि इतर लोकांशी गरज म्हणून संबंध राखून असतो. ह्या गरजांची रुपं अनेक असू शकतात शारिरीक, भावनिक, आर्थिक वगैरे वगैरे. ह्यातूनच मग आपण एकमेकांना घट्ट धरून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो कधीकधी सहजपणे तर कधी अगदी अट्टाहास धरतो. आणि मग ही गुंतागुंत वाढतच जाते. आणि आपण रस्त्यात दिसणार्‍या समोरच्या व्यक्तीला बघून हसायच विसरून जातो. आणि मग उरतो तो फक्त एक हिशोब! उपयोगमुल्य
*****

5 comments:

Sangram said...

खरय ...!

Deep said...

Dhnywaad aani marathi ingrjaalelya akshrat typlyabddl swaree ;)

khare aahe pan bochnare aahe naahi :(

Anonymous said...

तुम्हाला, तुमच्या कुटूंबियांना, मित्रांना, आप्तेष्टांना व नातेवाईकांना, सर्वांनाच ही दिपावली आनंदाची जावो; येणारे वर्ष समृद्धीचे व भरभराटीचे जावो ही सदिच्छा!

पुन्हा एकदा दिपावलीच्या लाख लाख शुभेच्छा!

अपर्णा said...

तू कधीतरी एकदा येऊन माझ्या ब्लॉगवर खूप खूप प्रतिक्रिया देऊन गेल्यानंतर बर्याचदा ठरवलं होतं की तुझा ब्लॉगपण वाचेन...माहित नाही काय योग आहे पण नेहमीच राहातं. वाचन खूप करतोस का?? (आणि त्यामानाने स्वतःच्या ब्लॉगवर दर्शन कमी??) असो....:)
मला सांग तुला ही सानिया परवानगी द्यायला बरी मिळाली?? लकी आहेस....:)

Deep said...

हेमंत,

धन्यवाद :) अहो जाहो नको हो ;) दिपावलीच्या शुभेच्छा! बादवे वर ^ लिहिलेल्या पोस्टबद्दल काहीच कसं लिहिल नाहीस? असो पुन्हा एकदा थँक्स.

अपर्णा,

मी कधीतरी एकदा येऊन तुझ्या ब्लॉगवर लिहिलेल्या प्रतिक्रियांमुळे जर तू इथं येऊन वाचणार असशील तर अवश्य वाच! पण बघ पुन्हा एकदा विचार कर. संवादिनीचा सूर, तेजस्वीनीचे तेजस्वी लेखन, ट्युलिप च्या सदाबहार गोष्टी अन् असं बरच काही मौल्यवान नाही मिळणार कदाचित पण थोडफार आ/नावडल तरी सांग नक्की म्हणजे अस्मादिकांना हुरूप येईल. सानियाची गोष्ट नंतर सांगेन ते एक वेगळीच गंमत आहे. अशीच येत रहा स्वागत आहे :)