तिचं "Banker to the poor" वाचून झाल होतं आणी आता तिला ते "Path - Breakers" वाचायच होत... म्हणून ते दोघं आज भेटणार होते... ठरलेल्या वेळी निघताना जो कोणी पहिल्यांदा पोचेल तो भ्रमणदुरध्वनी वरून तातडीचा संदेश पाठवेल अस ठरलही होतं... पण का कोण जाणे त्याला वाटलं की आज भेटणं होणार नाही आणी १०च मिनिटात तिचा फोन आला की आज जमणार नाहे बहुतेक... तो म्हणाला ठीकाय उद्या भेटूच की उद्या वीकांत... तुलाही सुट्टी असेल नं??
ती: अरे नाही उद्या मी बंगळुरात जात्ये पुढचा आठवडा तिथेच असेन बहुतेक...
तो: ठीक आहे आपण नंतर भेटू निवांत..
********
जवळ जवळ दोन आठवडे झाले होते ह्या त्या दोघांच्या संभाषणाला.. आणि ह्या दरम्यान तोही जरा बिझी झाला होता.. दिल्लीला जाऊन क्लायंटशी फायनल डील करून कालच परतला होता.. आणि शनिवार, रविवारला जोडून आलेल्या सुटट्टीचा पुरेपूर फायदा उठवण्यासाठी तो ४ मित्र मैत्रिणींसोबत ट्रेकला निघाला होता... गाडी स्वत:चीच असल्याने सारेजण फारच मजेत ओरडा आरडा करीत होते.. घाटातून जाताना वेग फक्त कमी होता पण धांगडधिंगा चालूच होता.. साहेब स्वत: गाडीवान झाले होते म्हणून त्यांचा आवाज जरा कमी होता.. इतक्यात त्याचा फोन वाजला म्हणून त्याने तो शेजारील सीटवरील मैत्रीणीकडे दिला.. नंबर ओळखीचा होता पण काही केल्या त्याच्या नाव लक्षात येईना [कारण त्याला एक म्हटली तर वाईट सवय होती.. तो कधीही कुणाचेही नंबर नावानिशी सेव्ह करत नसे.. सारे कोड वर्ड मध्ये..] मैत्रीणीने फोन उचलला आणि तो स्पीकर मोडवर ठेवला.. आता त्याच्या आवाजा वरून लक्षात आलं की 'ती'चा फोन आहे... त्याने फक्त दोन मिनीट असं म्हणून गाडी घाटातच थोडीशी आडोश्याला उभी केली... झालं तोपर्यंत इकडे गाडीत "टिपीकल खेचाखेची"> कोणाचा रे फोन? बॉस की काय? गाडी का थांबवतोयस? हीहाहा.. >चालू झाली.. त्यानं सर्वप्रथम फोन होल्ड वर ठेवला.
साहेब फोन घेउन बाहेर पडले.. अन् गाडीच्या उलट्या दिशेने चालू लागले.. इकडे फोनवर आता ती ही खेचत होती.. काय रे तुझा मोबाईल कुणी उचलला?....
बाकीच इकडच तिकडच बोलून झाल्यावर गाडी रुळावर आली आणि बोलता बोलता त्याच्या लक्षात आलं की 'बाईसाहेबही' ट्रेकला त्याच ठिकाणी निघाल्या होत्या.. फक्त त्या आधीच तिथं पोहचल्या होत्या. त्यानं सांगितल्यावर ती म्हणाली ठीकाय मी थांबते.. म्हणजे आम्ही..
तो: तशी काय गरज नाही गं तुम्ही गेलात पुढे तरी चालेल.
ती: का पण?? आम्ही थांबलो तर नाही का चालणार? कोणी आहे का स्पेशल? आता ती परत खेचत होती..
तो: अगं बाई असच काही नाही.. मला वाटलं की तुम्हाला उशीर होईल म्हणून फक्त.. ठीकाय थांब आम्ही पोहचतो २० मिनिटात...
*********
साहेब गाडीत शिरले आणि शिस्तीत गाडी चालू करणार इतक्यात त्याच्या लक्षात आलं की चावी कुणीतरी काढलेली आहे.. बाकीचे लोक आपापल्या दंगामस्तीत गर्क होते.. कुणाला विचारावं बर असा विचार करून साहेब मागे पहातात तो काय? त्याची नुकतीच काढलेली चित्रं मागं लोक बघत होती... झालं आता त्याच्या लक्षात आलं की आता लेक्चर आहे... 'त्यांचा' एक अलिखित नियम होता.. कुठलीही गोष्ट लपवायची नाही आणि साहेबांनी तर ४/५ चित्रं लपवली होती तो असं कधीही करायचा नाही नवीन काढलेल्या चित्रांचा पहिली समिक्षा ते ४ जण कायमच करत आले होते.. नेमकं ह्या पार्श्वभुमीला 'she's got the look' गाणं लागलं होतं.
तो काही बोलणार इतक्यात चारही जण एकदम ओरडले: she's got the look!!
आणि त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार झाला! कोण रे ही? हीच ना जिचा आत्ताच फोन आला होता? गाडीतलं चित्रं कधी काढलस? नाव काय? प्रपोझ केलस का? लग्न ठरलय का? को.ब्रा. का रे? डोळे अगदी टिपीकल आहेत.. अगदी 'रारंग ढांग' मधली उमा वाटत्येय. असे अनेक प्रश्न... तो म्हणाला एक मिनीट थांबा... आता तिचाच फोन आला होता.. आपण जिथं जातोयना ट्रेकला तिथेच ती जाते आहे म्हणजे पोहचली आहे... आणि म्हणाली की थांबते तेंव्हा तिलाच हे प्रश्न विचारा.. त्याला माहित होत की ते असलं काही करणार नाहीत.. हो का? बरं आता थांब विचारतोच आम्ही.. असं म्हणत मागून चावी देण्यात आली आणि शेवटी त्यान मंदसं हसत गाडी चालू केली... कसं काय माहित पण प्ले लिस्टही चेंज झाली होती... आता 'मेरा पहला पहला प्यार है ये..' एम पी थ्रीतल लागल होत.
बरोबर २०मिनीटात ते नियोजित स्थळी पोहचले.. आणि बघतो तर काय बाईसाहेब फोटोग्राफीत दंग होत्या.. त्यानं गाडी पार्क केली आणि बाकिच्यांनी तंबू व इतर सामान काढायला सुरूवात केली.. टिपीकल इन्ट्रो. झाल्यवर ते सर्व ८ जण एकत्र नाश्ता करायला बसले.. व्हेज-नॉनव्हेज असं ठरवून ऑर्डर दिली गेली... तोपर्यंत बाकीचे लोक धुरांडी काढून बसले.. त्यात ती ही सामिल झाली.. त्याला जरा ऑड वाटल पण तो स्वत:ही ओढत होताच आणि गंमत म्हणजे ते दोघेही ५५५च ओढत होते... ट्रेकला सुरूवात झाली... दोन तीन तासात ते पोहचले... संध्याकाळ झाली होती म्हणून त्यांनी तंबू ठोकायला सुरूवात केली.. रात्रीच्या जेवणाची तयारी चालू झाली. एकीकडे कॅम्पफायरची ही तयारी झाली होती.. जेवण झाले आणी सगळे जण अंताक्षरी खेळायला एकत्र आले... सुरूवात तीने 'अजी रूठकर अब कहॉ जाइयेगा..' ह्या गाण्यानं केली... अंताक्षरी रंगत गेली... आणि अचानक त्याला फरमाईश झाली.. लगेच मागून कुणीतरी गिटार पास केली आणि साहेबांनी सुरूवात केली ती.. 'Brayan Adams' च्या 'When you love someone...' ने केली मनसोक्त गिटार वाजवून झाल्यावर त्यांनी Truth or Dare.. खेळायला सुरूवात केली...
क्रमश:
3 weeks ago