आज बर्याच दिवसांनी ते दोघे समुद्रकिनारी कॉफी घेत बसले होते... मे बी वेळ मिळत नव्हता किंवा काढायचाच नव्हता... संध्याकाळी त्यानं फोन करून आज आपण भेटूयात का? असं तीनदा विचारल्यावर तीने 'कॉफीला' होकार दिला होता.. नेहमी प्रमाण १:३० तास वाट बघायला लावल्यावर ती कॉफीशॉप मध्ये पोहचली.
तिची वाट बघत तो laptop वर ब्लॉगस्/ मेल्स तपासत होता...
ती: ओ आज फारच लवकर पोहचलास की रे तू! कसा काय??
तो: फार नाही १० च मिनीट झाली (खोटं! त्याला वाद वाढ वायचा नव्हता.) काय घेणार?
ती: अं... काहीच नको.. रात्री जेवायच आहे. आणी मला भलत्या सलत्या वेळी काहीही खायची सवय नाही!
तो: बर.. मला भूक लागली आहे! कॉफी घेशील ना?
ती:(विचारात: किती दिवसांनी अशी निवांत कॉफी घेईन म्हणत्ये मी..)हो मला कोल्ड कॉफी चालेल.
तो: ऑर्डर देतो.. दोन कोल्ड कॉफी, १ चीझ ऑम्लेट
ती: आज काय विशेष?
तो: काही नाही सहज..
ती: सहज म्हणून तीनदा फोन केलास मला?? अरे बोल मी दोन मिटींग पोस्टपोन करून आल्ये!
तो: अगं मला वाटल.. तिचा फोन वाजला.. आणी मग पुढचा अर्धा तास ती फोनवर बोलत होती..
कॉफी संपवून तो तिचा फोन कधी संपेल ह्याची वाट बघत होता.. खरतर त्याला तिच्याशी खूप काही बोलायच होत पण ती नेहमीप्रमाणं तेवढी फ्री राहिली नव्हती! आणी हे त्याला प्रकर्षान जाणवत होत..
ती: (बरोबर ४५ मि. नी) हां बोल लवकर मला जायचय ऑफीसमध्ये..
तो: काही नाही मी कॉ फी सांगतो.. १ कोल्डकॉफी!
इतक्यात तिचा फोन परत वाजतो आणी ह्या वेळी मात्र ती फोन घेत बाहेर जाते..
तो: (विचारात- आज काल काय झालय काय आपण पूर्वी सारख बोलत का नाही?)
ती: पटकन आत येत अरे मी फोन होल्डवर ठेवलाय जपानचा कॉ. कॉ. चालू आहे! मला लगेचच जाव लागेल आता बाय!
त्याच्या उत्तराची/ प्रतिसादाची वाटही न बघता ती निघते..
आणी तो तसाच बसलेला असतो... (तिची) दुसरी कॉफी संपवत...
जगजीतच्या ओळी गुणगुणत... हाथ छुटे भी तो रिश्ते नहीं छोडा करते..
दीपू द ग्रेट
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"
3 weeks ago
4 comments:
हाथ छुटे भी तो रिश्ते नहीं छोडा करते..
agree yaar...kharach life khupach busy jhaalay....mast lihilays....
धन्यवाद सुप्रिया/ सई!! मी ही वाचलाय तुझा ब्लॉग छानच लिहितेस तू
दीपू द ग्रेट
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"
Well said.
Hey Nayana thanks a lot! phaarch late reply detoy i know.
Post a Comment