एक प्रवास... कधीही न संपणारा...
संध्याकाळी ६-६:३० ची वेळ तो नेहमी प्रमाण उलटा चालला होता भायखळ्याला. खरतर दादर वरून ट्रेन पकडण जास्त जवळ होत पण सोयीच नव्हत.. कारण दादरला गाडीत चढता येण म्हणजे पुण्यात गाडी चालवण्यासारखच होत एकवेळ पुण्यात गाडी चालवता येईलही... पण दादरहून गाडी पकडण म्हणजे नसलेल्या एनर्जीचा र्हास ( तरी तो दररोज संध्याकाळी निघताना एनर्जी प्यायचा ही..)
तर आजही नेहमी सारख तो स्लो लोकलने भायखळ्याला उतरला आणी उलट दिशेने जाणार्या जलद लोकलची वाट पाहात राहिला... तसा वेळ बराच होता आणी भूकही खूप लागली असल्यान हल्दीराम चिवडा विकत घेतला.. एक पाकीट खिशात टाकून एक त्यानं तिथच फोडल आणी खात सुटला.. तिथे एक गरीब लहान मुलगा आणी मुलगी त्याच्याकडे पैसे मागत होते खाण्यासाठी... झटकन त्याचा हात सवयीप्रमाणं पाकीटाकडं गेला आणी तो पैसे काढून त्यांना देणार इतक्यात त्यान विचार बदलला... [Banker to the Poor त्यान नुकतच वाचल होत. कॉलेज मधे पॉवरपॉइंटवर प्रेझेंटेशनही केल होत..] त्याचाच परिणाम असावा.. आता तो त्या मुलांना त्यांच नाव, गाव, शिक्षण वगैरे विचारत होता.. शाळेत जाता की नाही वगैरे प्रश्न विचारत होता मुलही सांगत होती जमेलतसं काही पैसे मिळतील ह्या अपेक्षेनं... आणी नेमक त्यानं काय केल तर त्या दोघांना दोन वडापाव खायला दिले... आणी दोन चॉकलेट्स सुद्धा! कदाचित त्या मुलांना हे सारं अपेक्षित नसावं एवढं सगळं झाल्यावर ती मुलगी रडवेल्या स्वरात त्याला म्हणाली काही पैसे द्या त्याशिवाय घरी जाता येणार नाही... त्यानं विचार केला आणी त्या दोघांना ५-५ रू. दिले.
एवढ्यात त्याची गाडी आली नेहमी प्रमाणं तो चालत्या गाडीत चढायला सोप जाव म्हणून लेडीज फर्स्टक्लास जवळ उभा राहिला... गाडी स्लो होत गेली आणी तो चटकन गाडीत शिरला आज मात्र कमाल झाली त्याला थेट आत पर्यंत पोहचता आलं बसायला जागा मिळणार नव्हतीच पण आज तो एकदम आत व्यवस्थित उभा राहू शकला.. गाडीनं वेग घेतला आणी तो स्थिरस्थावर झाला.. हल्दीराम चिवडा एका हातात आणी Puneet sriwastava च The "Path - Breakers"एका हातात अश्या स्थितीत तो उभा होता इतक्यात त्याच लक्ष लेडीज फर्स्टक्लास मधल्या एका अत्यंत सुंदर अश्या तरूणीकडं गेलं [सुंदर.. अस त्याच म्हणण प्रत्येकाच परसेप्शन वेगळ असतं..] ती ही त्याच्याकडेच बघत होती आणी अचानक त्याला आठवल की मगाशी ही तीच मुलगी होती जिनं त्या दोन लहान मुलांना 'चल हट भिकारी... न जाने कहॉं से आते है' असं उडवून लावल होत आणी आता ती त्याच्याकडे पहात होती... आणी तो ही पहात होता फार छान दिसत होती ती त्या संपूर्ण पांढर्या चुडीदारमधे.. सोनेरी वर्क केल होत आणी ते फारच उठुन दिसत होतं. त्यानं नीट बघीतल तिच्या हातात सानियाच 'आवर्तन' होत.. [तो मनात म्हणाला अरे वा ही मुलगी मराठी दिसतेय तर..] तिचा चेहरा अत्यंत गोड दिसत होता... एक तीळ होता नाकावर आणी तिच्या डाव्या गालाला खळी पडत होती.. एक बट येत होती चेहर्यावर ती ती सारखी उजव्या हातानं मागे करीत होती.. [ एकीकडे त्याला प्रश्न पडला की एवढी छान दिसणारी मुलगी त्या दोन गरीब मुलांना चल हट... असं कस काय फटकारू शकते?? केवळ पैसे मागितले म्हणून? की नेहमीच मुलींना असल्या लोकांकडून होणार्या त्रासामुळे? की फक्त आपल्याकडे आज पैसे आहेत आणी त्या दोघांकडे नाहीत म्हणून? की टिपीकल मुलींना असलेला फुकाचा गर्व??] त्याच्या मनातल्या प्रश्नांच वादळ काही संपत नव्हत आणी Banker to the Poor वाचल्यावर तो चुकुनही कुणाला रोख पैसे देत नसे जमेल तशी मदत तो करत होता... अजूनही तो भिकारी हा शब्द विसरला नव्हता... भिकारी केवढा भयानक अर्थ होता ह्या शब्दात अस त्याला वाटलं.. गरीब कोण नसत? नात्यांच्या बाबतीत, पैश्यांच्याबाबतीत, पण भिकारी?? असाच विचार करता करता त्याला बसायला जागा मिळाली.. नेहमीप्रमाण तो चार स्थानकं बसला आणी दुसर्याला बसायला जाग द्यावी म्हणून उठला... पुस्तक बंद करून उभा होता आज त्याला वाचायलाच जमल नाही सारख तोच विचार होता त्याच्या मनात कोण भिकारी नाही या जगात??
त्याच स्टेशन आल आणी तो उतरला.. बघतो तर काय ती मगाचचीच मुलगी ही उतरत होती एकदा त्याला वाटत होत की तडक जाउन विचारावच तिला पण नंतर विचार आला जाउदे जे तिला करायच होत ते तिनं केल आता विचारून काय उपयोग?? अश्या विचारात तो पुढे जात असताना मागून कुणीतरी त्याला हाक मारली excuse me... तो मागं व ळू न पहातो तो काय तिच मुलगी.. तिन बोलायला सुरूवात केली.. actually मगाशी तू जेंव्हा त्या मुलांना खायला दिलस नं तेंव्हा मी तिथच होते.. तू त्याना खायला दिलस आणी वर पैसेही?? का?? कशासाठी?? अरे हे भिकारी दररोज सगळ्यांना त्रास देतात..
तो: भिकारी नाही तुला गरीब म्हणायच का? आणी पैश्याचच म्हणशील तर मी ते देणारच नव्हतो पण त्यावेळी दुसरं काहीही देउ शकलो नसतो म्हणून दिले पैसे..
मग असच इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत असताना एकमेकांची ओळख झाली.. आणी त्यान तिला म्हटल की खूप मोठा प्रश्न आहे हा सध्यातरी इथंच थांबूया.
ती: बर चालेल पण आत्ता ते "पाथब्रेकर्स" देशील का रे वाचायला?
तो: हो नक्कीच माझं वाचून संपल की देईन.. तुला पाहिजे तर "Banker to the poor" वाच सध्या.. तुझ्या जवळ जवळ सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत ह्यात...
16 years ago
No comments:
Post a Comment