१० सप्टेंबर...
आज काहीही करून सांगायचच तिला असंच काहीसं ठरवून तो कॉलेजसाठी म्हणून बाहेर पडला. रस्त्यात गाडी पंक्चर झाली... स्टेपनीही नव्हती... अन् त्यात त्याचा एक तास गेला! फोन करून कळवायच म्हणून खिशातून फोन काढला तर बॅटरी लो!! तरी त्याने एकदा ट्राय केला... तिचा फोन एन्गेज होता नेमकं ह्याच वेळेला हीचा फोन एन्गेज असं म्हणून वैतागून त्याने मेसेज टायपायला सुरूवात केली अन् तेवढ्यात त्याचा फोन बंद झाला...
कॉलेजमध्ये पोचला अन् समोरून प्रिन्सी. येताना दिसल्या... झालं आता अर्धा तास सुटका नाही असा विचार त्याच्या मनात आला. पण प्रिन्सींनी येत्या शनिवारच्या वर्कशॉपच्या तयारीबाबत जुजबी चौकशी केली आणि काही लागलं तर कळव असं म्हणून त्या निघून गेल्या... हुश्श करतो न करतो तोच ती समोर आली!!कुठे होतास? उशीर का झाला? वगैरे काहीही न विचारता ती सरळ निघून गेली...
आणि हा एक्स्प्लेन करत मागे गेला... अगं गाडी पंक्चर झाली होती स्टेपनीही नव्हती म्हणून उशीर झाला गं सॉरी!
ती: सॉरी?? व्हॉट फॉर?
तो: उशीर झाला ना म्हणून मी फोन ही ट्राय केला तुझा पण एन्गेज होता...
ती: बास! मी विचारलय का कारण? कशाला स्पष्टीकरण देतोयस? मी कोण लागते तुझी ही एवढी स्पष्टीकरण द्यायला?
तो: ...
ती: चल मी निघत्ये शनिवारच्या वर्कशॉपच्या मिटींगला जायचय मला!
तो: अगं पण...
ती: मला उशीर होतोय नंतर बोलूया!
***
संध्याकाळी घरी निघताना तो तिला विचारतो माझे गाडी गॅरेजमध्ये आहे मला घरी सोडशील?
ती: मला भूक लागल्ये खाऊगल्लीत जाऊ आणि मग सोडेन...
तो: ओके. चालेल मला पण भूक लागल्ये :)
ती: मी आलेच दहा मिनिटात लायब्ररीत बुक्स रिटर्न करायच्येत..
तो: ठीक आहे मी थांबतो खालीच कॉरीडॉरमध्ये ओके?
ती: हं ठीक आहे.
***
खाऊन बरिस्तात कॉफी घ्यायची का?
ती: बरिस्तात कॉफी ? तूला नाही ना आवडत??
तो: नाही गं आवडत नाही असं काही नाही...
ती: मागे मी म्हणाले चल तर म्हणालास बोर होत फार...
तो: हं आता नाही होत!
ती: ...
तो: चल जाऊया
***
बरिस्तात मोठमोठ्या आवाजात गाणी लागली होती... आणि एकदम गाण चेंज झालं... तिच्या आवडीच सोचा ना था तल: अभी अभी मेरे दिल में खयाल आया है लागलं होत. तिचा मूड एकदम चेंज झाला.
बर्याच वेळ गप्पा मारल्या तीन तीन कॉफी रिचवून बाईसाहेब म्हणाल्या तू सकाळी मला एवढी स्पष्टीकरण का देत होतास?
तो: तुला माहिती नाही?
ती: मला कसं माहित असणार?
तो: खरच तुला माहित नाही?
ती: नाही!! सांगायच असेल तर सांग नाहीतर राहूदे..
तो: ओके सांगतो सांगतो... पण इथं नाही चल जरा चालूया
ती: चला आज तुम्हाला कॉफी प्यावीशी वाटली, आता चालावसं ही वाटतय काय झालय काय?
तो: ह्म्म्म्म नंतर एक लाँग ड्राईव्हही करूयात!
ती: ओह गॉड प्लीज टेल मी धिस इज नॉट अ ड्रीम!!
तो: ते सांगायला गॉड कशाला पाहिजे? मीच सांगतोय धिस इज नॉट अ ड्रीम!
ती: ओह व्हॉट अ डायलॉग!! नाटकाच्या रोलमध्ये घुसलास की काय?
तो: ... नाही
ती: हं चल चल पटकन तुझा मूड चेंज व्हायच्या आत
तो: चल माझा काय मूड वगैरे चेंज नाही होत हा
ती: हो का? बर बर परवा कोण गेलं होतं रे मूड नाहीये म्हणून?
तो: मीच गेलो होतो पण तू काय अगदी शब्दात पकडायच ठरवलच आहेस का मला?
ती: नाही ठरवलेलं नाहीये अन् ठरवून तरी काय उपयोग?
तो: हो का सांगतो थांब
ती: हाहाहा सांगच
***
चौपाटीवर भेळ खात बोलूया का?
ती: मला क्वालिटी वॉल्सच आईसक्रीम पण पाहिजे!!
तो: ह्म्म्म ओके खाऊया की :)
ती: आज सुरज कहॉसे उगा है?
तो: पूरबसे हमेशा की तरह हेहेहे
ती: चूक!! सुरज पुरबसे उगता नहीं क्यों की वो डुबता ही नही है
तो: हाहाहा खरय!
ती: आता बोलणार आहेस का?
तो: होय बोलतो ना...
***
तो: ह्या वर्कशॉपनंतर आपण ट्रेकला जायचय ना?
ती: हो जायचय!
इकडच्या तिकडच्या गप्पा पुरे आता...
हा तर काय बोलणार होतास तू? अरे आता भेळ झाली आईसक्रीम झालं बोलणार आहेस की नाही?
तो: तर मी काय म्हणत होतो की... कस सांगू
ती: कसही सांग रे
तो: अस कस कसही...
ती: ए बाबा सांगतोस का आता की मी जाऊ?
तो: ह्म्म्म अगं
ती: अरे पुढे खड्डा अहे जरा बघून चाल पडशील!
तो: तू है तो तेढी मेढी राहें उल्टी पुल्टी बातें सिधी लगती है तू है तो झुठे मुठे वादें दुश्मन के इरादें सच्चे लगते है जो दिल में तारे वारे दे जगा वोह तु ही है, वोह तु ही है...
ती: प्लीज!!! it happens only in Bollywood films!! & not in real life so grow up...
तो: छोटे छोटे कुछ पलों का दोस्ताना यें...
ती: oh please...
तो: जानें क्यों लोग प्यार करतें है
ती: प्यार?? love?? is the sugar quoted pill which is used by he businessman for the selling the products!
तो: में शायर तो नहीं...
ती: ह्म्म्म मग कशाला उगाच गळा फाडतोयस? गप्प बस ना...
तो: ह्म्म्म मेरी सोनी मेरी तमन्ना झूठ नहीं है मेरा प्यार.. दीवाने से हो गई गलती जाने दो यार I love you!!!
ती: "..."
तो: I love you!!!
ती: please stop it! लोक बघतायत.
तो: I love you! I love you!! I love you!!! I really do
ती: हे बोलायला इतका वेळ घेतलास तू?
तो: आत बोललोय ना? अगं मला वाटलं होत की... तू...
ती: बास! आता काहीही बोलू नकोस तू
तो: ओके
ती: " I love you"
तो: चल आता आणखी एक कॉफी घेऊया सेलीब्रेट करुया
ती: मला दोन!! :)
***
आणि ह्यावेळी गाणं लागलं होत:
दीवाने है दीवानोंको ना घर चाहिएं मुहब्बत भरी एक नजर चाहिएं... बिना प्यार के जिंदगी कुछ नहीं...
दीवाने है दीवानोंको ना घर चाहिएं मुहब्बत भरी एक नजर चाहिएं :)
3 weeks ago
3 comments:
chhan aahe, majja aali vachtanaa
anubhavache bol ka?? ;) (diva ghe)
chhan lihili aahes..keep it up
Vivek kaka thank you
Mugdha ag anubhavache naahiet he bol khrch! :D
Post a Comment