Thursday, August 20, 2009

Please DELETE the old data memory is full... !!

Please DELETE the old data memory is full...
असा मेसेज सारखा माझ्या हार्डडिस्क मधून येत होता. कितीही म्हणून मेमरी डिलीट करायचा प्रयत्न केला तरी काही केल्या ती होत नव्हती (की करवत नव्हती?) पण केली एकदाची डिलीट! हो अगदी सगळी कडून म्हणजे मोटोरोला, सोनी इरीक्सन ह्या दोन्ही फोन्समधनं सगळे "... " नंबर्स डिलीट केले. फोटोज काढले. पीसीतूनही डेटा नष्ट केला. अगदी जुने काही फोटो होते ते मात्र ठेवले कारण काही विशेष नाही ते फाडून टाकावेत असे नव्हते आणि खरेतर एवढं सगळं डिलीट केल्यावर तेही नष्ट करावेत ह्याची काही गरज मला भासली नाही. काही जाणवतच नव्हतं तेंव्हा...

झाल काय...

तिच्या वाढदिवसाला म्हणून फोन केला तेंव्हा अरे कित्ती वर्षांनी बोलतोय आपण, काय चालू आहे, कसा/शी आहेस असं काहीही न बोलता मी विश केलं आणि तिनं थॅन्क्यू म्हटलं.
सगळं कसं यंत्रवत वाटलं. एकदम कोरड. आणि तत्क्षणी मी ठरवलं की बास झालं आता उगाचच वाढदिवस वगैरे लक्षात ठेवणं विश करणं ह्याला तसा काहीही अर्थ उरलेला नाही.
*****

थोडी थोडकी नाही चार पाच वर्ष झाली होती माझ्या सो कॊल्ड प्रेमभंगाला. (?) अगदी टिपीकल देवदास नाही पण तसाच काहीसा वागत होतो तेंव्हा मी. (नाही "तू नहीं तो गम डुबाने के लिए शराबही सही" असा विचारही माझ्या मनाला शिवला नाही कारण दारूचा प्रचंड तिटकारा आणि सो कॉल्ड गम में दारू पिणारे बरेच लोकही बघितल्येत मी टिपीकल बावळट लोक असतात नशिबाला दोष देत बसतात) हे जरा कंसातल म्हणजे स्वगत जरा जास्तच होतय ना? होणारच अहो हा माझ्याशी माझा संवाद आहे! चला मी का लिहतो ह्या प्रश्नाच सर्वात सोप्प आणि एका वाक्यात उत्तर मिळालं ;) पण म्हणून संदर्भासहित स्पष्टीकरण मिळणार नाहीये हं लगेच.

आता विचार केला की हसू येतय पण तेंव्हा मी तस्साच वेड्यासारखा वागत होतो आणि जी कोणी व्यक्ती मला समजावत होता तिला धुडकारत होतो, सांगत होतो की प्रेम हे वेडच असतं.
हो प्रेम हे खरोखरच वेड असतं ह्यावर माझा अजूनही विश्वास आहे.
आणि झूट नसतं ह्यावरही. कारण ते असतं किंवा नसतं एवढा सरळ हिशेब आहे.
आज कमी आणि उद्या जास्त असं काहीही ह्यात नसतं.

पण मी जे काही वागत होतो ना त्यातला वेडेपणा जरा जास्तच होता. हे कित्तीतरी लवकर कळतय मला :)

मग टाईमपास करायला म्हणून मी जब वी मेट, तुम बिन बघायला लागलो ज्याम बोर झालो कधी नव्हे ते शाहिद, करिना, संदालीच्या प्रत्येक डायलॉगवर कमेन्ट्स केल्या. दोन्ही पिक्चर तासाभरात बंद केले आणि मग "In Good Company" आणि "The Holiday"बघितला वॉव सह्ही फिलींग आलं एकदम.

*****

हे सगळं आत्ता का सांगतोय असं जर का वाटत असेल ना तर सांगतो फार झालं प्रेम अन् प्रेमकथा वगैरे ब्लॉगवापे. आता मी तसलं काहीही लिहिणार नाहीये निदान थोडावेळतरी... (म्हणजे नंतर लिहेन कथा पूर्णत: काल्पनिक ;) )

अब जो भी होगा एकदम झकास रिअल अ‍ॅन्ड फंडू होगा नो इमोसन ड्रामा अ‍ॅन्ड अत्याचार!

1 comment:

Kamini Phadnis Kembhavi said...

ह्म्म! जवळजवळ प्रत्येक आयुश्यात येणारा एक टप्पा...गुड लक ..आल इज्ज वेल :)