Tuesday, August 18, 2009

एक प्रवास... कधीही न संपणारा... (फायनल)

क्रमश:>>>

८ सप्टेंबर ३:३०
आजची सकाळची प्रेस कॉन्फरन्स आटोपून ती कॅफेटेरियात बसली होती निवांत. "चराहों को जलाने में जलाली उंगलिया हमने समझतें थे पर ना रखी दुरियाँ हमने" जगजितची ही गझल तिने तीन वर्ष आधी त्याच्या बरोबर ऐकली होती. अन् आज एकदम भरून आलं होत तिला. जवळजवळ ५ वर्ष पूर्ण झाली होती आणि त्यांनी ठरल्याप्रमाणे ह्या १० तारखेला भेटायच नक्की केल होतं. आता वेळ आहेच तर एखादं छानसं गिफ्ट घेऊया असं विचार करत तिनं त्याच्या आवडीचा लुईस फिलीपचा व्हाईट कलरचा शर्ट घेतला आणि ती घरी निघाली...
***
इकडे हाही तिला भेटायला फार उत्सुक झाला होता. तिच्यासाठी ह्यानं "मितवा" घेतलं आणि जगजितची मरासिमची सीडी.

१० तारखेला हा तिच्या घरी गेला आणि दोघे लंचसाठी म्हणून बाहेर पडले...

आणि तिनं पुन्हा एकदा विचारलं: काय वाटतं तुला माझ्याबद्दल?
तू खूप हुशार आहेस!
बस्स एवढंच?
नाही तू खूप हुशार हट्टी आणि सुंदर आहेस :)

हॅ अजिबात नाही मी मुळ्ळीच सुंदर नाहीये.

का? सावळं असणं म्हणजे सुंदर नाही असं कुणी सांगितलय तुला? की फक्त गो र असणं हा सुंदरतेचा निकष आहे?

आता सांगशील का?
मला माहित्ये तू काय विचारणारेस ते अन् ह्याच उत्तरही मी तुला तेंव्हा दिल होतं
हो मला वाटलं की काळानुसार तू विचार बदलला असशील
परत एकदा विचारते will you marry me?
You know the answer isn't it? it is not possible.

म्हणजे? तुला खरंच लग्न करायच नाहीये का? आपलं स्वतःच घर, गाडी, मुलं असाविशी वाटत नाही का?
नाही! हे तुला सुद्धा चांगलच माहिती आहे. आणि घराबद्दलच म्हणशील तर एवढं पुरेस आहे की आपल्याला.
म्हणजे तू मला माझं स्वतःच असं काहीही देणार नाहीस तर
तूला काय लग्नाच नाव हवय का? फक्त?
...
...
म्हणजे माझ्यावर प्रे म नाही असंच म्हण की सरळ सरळ
हा प्रश्न तू तुझा तुलाच विचार अन् बघ काय उत्तर मिळतय ते.

केवळ लग्न केल्यावर प्रेम आहे हे जर का सिद्ध होणार असेल तर मला नाईलाजास्तव म्हणावं लागणार आहे की माझं प्रेम सिद्ध नाही करता येणार असं...

म्हणजे मग कशाचीच शाश्वती नाही असंच ना?
हे बघ शाश्वत, निरंतर असं काहीही नसतं. केवळ लग्नाच सर्टिफिकेट असलं की शाश्वती मिळणारे का?
उलट लग्नानंतर बाईचा छळ करणारे सासरकडचे लोक, नवरा ह्यांच्या काय कमी केसेस बघितल्यास तू आजवरच्या तुझ्या करिअरमध्ये?
हो बघितल्यात की भरपूर पण आपलं काही तसंच नाही होणार म्हणून
हो ते माहिती आहे मला म्हणून काय मी लग्न करू का? लग्नसंस्थेवर तुझा माझा कधीच विश्वास नव्हता ना?
...

हे बघ केवळ एक बांधिलकी म्हणून म्हणशील तर हा आपला एक कधीही न संपणारा प्रवास आहे ह्यात ना मी तुझी कधी साथ सोडेन अन् ना तू कधी ह्याची मला खात्री आहे.
आपण दोघेही रेल्वेच्या रूळांप्रमाणे आहोत एकमेकांना समांतर, पूरक.


भाग २ http://aschkaahitri.blogspot.com/2008/08/3.html
भाग १ http://aschkaahitri.blogspot.com/2008/08/blog-post_12.html

3 comments:

Mugdha said...

khup aavadali mala katha pan are khu tutak vattey..
thodasa aadhicha bhaagahi navya post madhye lihit ja mhanaje link milate..
pan overall chhan..

ओहित म्हणे said...

भाऊ ... बरेच दिवस ओपन करून ठेवलेले ... आज संपवली कथा! मस्त झालीये. भाग २ आणि ३ मधे काहीतरी मिसींग वाटतय पण.

Dk said...

भाग २ आणि ३ मधे काहीतरी मिसींग>>hmmm life changes so the story! ;)