खरतर आजच दुसरी पोस्ट टाकावे असा विचार नव्हता पण म्हटलं होऊनच जाऊदे सुरूवात एकदम झकास ;)
24th June
*****
एखाद्या साध्या गोष्टी वरून अनुमान / निश्कर्ष काढू नये असं म्हणतात पण काल तर कमालच झाली!! मी पुण्यात>>हडपसरला एका इंटरव्ह्युसाठी जाऊन पोहचलो अन् सांगितल की मी आलोय! हाहाहा
अर्थात नाव गाव सगळं सांगितल तरी समोरची व्यक्ती म्हणे I was not expectin you! i was expecting DEEPAKA
मी: not me?? I 'm Deepak! we had a telecon. yesterday you only said to come by 11:00 & that's the reason I'm here!!
तर साहेब म्हणाले आम्ही दिपिका असं वाचलं होतं! अॅक्च्युली आम्हाला मुलगीच पायजे! फोनवर क्लायंटशी डील करताना वगैरे बरं पडतं...
मी: (च्यायला) ( ह्या पुढची सगळी कंसातली वाक्य मनात बरंका) अहो पण मी काम करू शकेन की सगळं!! हवं तर व्हॉइस ओव्हर देईन! काय? (तेच जमेल मला आणि स्वस्तही पडेल ;) )
आणि मग तो इंटरव्ह्यु पार पडला...
अजुनही दोन ठिकाणी गेलो तर हेच की आम्हाला मुलगी पायजे!! (bullshit...)
******
स्वारगेटला येताना रिक्षावाला माझ्याशी भांड भांड भांडला (आय मीन मी ही भांडलोच) सुट्टे पैसे नाहीत म्हणून अन् त्याचवेळी माझ्या बरोबरच्या मुलीला मात्र २ रु. सुट्टे नाहीत म्हणून सोडून दिलं!
***
मुंबईला परत जाताना बस कंडक्टरही अस्साच वागला...
५ मि. बस थांबवणार असं म्हणून ४थ्या मिनिटाला खाली उतरणार्या (सुंदर पण माठ हो माठच ४थ्या मिनिटाला खाली उतरणार्या मुलीला काय म्हणू?) मुलीसाठी १० मि. जास्त बस थांबवली...
***
वैतागलो ज्याम काय करावं बरं अश्या विचारात मी देवीला हॉट लाईनवर फोन लावला म्हटलं विचारुच की हे काय आणि का असं? (माझ्याच बरोबर. हो आता इतरांबरोबर ही असं होतय का? का होतय ह्याचा मी काय सर्व्हे नाही केलेला अजून)
देवी म्हणाली अरे चालायचच सर्वांना समसमान संधी द्यायची म्हणजे असं होणारच!!
हो का पण मी का? मलाच का त्रास म्हणजे मी काय घोडं मारलय? हे मनातलं तिला मात्र कळालं बरोबर. बरोबरच आहे ना देवीच ती :)
तू नसशील मारलं पण आपलं कॅरी फॉरवर्ड>> होतच असतं ना! हिशोब बरोबर व्हायला हवा!
***
ह्या वरून मी काढलेला निश्कर्ष: मी नाव चेंज करणे हाच एक (स्वस्तातला) उपाय! अन्य उपाय सुचवलेत तरी चालतील अपायकरक ठरणार नाहीत!
***
नंतर टीपी काय करायचा म्हणून जितक्या म्हणून मित्र/मैत्रिणींना फोन केला ना ते/त्या ज्याम बिझी होत्या! एकदम सगळ्याच कामात काय करणार नसीब अपना अपना.
थोडेसे सुखाचे शिंतोडे पावसाबरोबर पडले ह्या ट्रीपमध्ये...
श्रीयुत साजिरा यांजकडे चहापान झाल्यावर मी सिंव्हगड रोडवर मैत्रिणीला भेटायला गेलो खरा पण तिचा पत्ता काय तो शोधू न शकल्याने शेवटी हिराबागेतल्या>> मेहंदळे हाऊस जवळच्या पुस्तक प्रदर्शनात टीपी करून बुधवार साजिरा केला..
एफसीवर एक जुनी मैत्रिण (सह परिवार: तिचा नवरा आणि छोटुकली) भेटली.
***
आणि बसमध्ये
>>"affection is desirable money is absolutely indispensable"<< हे काल मी एका पुस्तकात वाचलं आणि नेमक तेंव्हाच माझ्या शेजाराच्या सीटवर एक मुलगी... उम्म एक सुंदर (उफ काय डोळे होते तिचे) मुलगी येऊन बसली! मी तत्परतेने पुस्तक बंद केल! :)))))))))))))))))))))))) (देवीने थोडासा अच्छा भी किया इस बंदे के लिए आय अॅम हॅपी)
अन् पुणे> ठाणे प्रवास सुखाचा गप्पा मारत झाला
नंबर्स एक्सचेंज केले का? वगैरे प्रश्न नॉट अॅट ऑल अलाऊड! :)
ओके. सांगतो
कारण... हीहाहा (माझी बॅटरी संपत आली होती आणि तिच्याकडे कागद नव्हता ( हे जरा आश्चर्यच म्हणायच) म्हणून मग हातांवर लिहिले नंबर्स आम्ही)
***
(बसमध्ये बसल्यावर तर असं ज्याम वाटत होत की हा प्रवास लांबुदे घाटात ट्रॅफिक असुदे पण छे असं काहीही व्हायच नव्हतं!!
सुखाच्या गप्पांवर एक झकास ललित लिहूया असा विचार करत हे की बोर्डावर बडवलय. ;)
आज का सुनने जैसा गाना: Hannah Montana : If We Were A Movie
16 years ago