Saturday, June 14, 2008

१ इनोदी सुंदर स प ना!! भाग २ . अंतिम ...


भाग पुढचा>>> छोट्याश्या (??) विश्रांती नंतर >>>

(त्याच काय आहे, माझं शिकण्याच वय असल्याने, मी MBA (mediocre but arrogant ?? हा सध्या प्रचलित असलेला फु. फॉ. ! मराठी शब्द आठवत नाहीये!) करीत असुन उन्हाळी कामं करण्यात genuinely मग्न होतो.

.....

तर आपली नायिका रात को १२:३० बजे 'मांडीवरील संगणकात'(lyaaap toopआत??) काही ई पत्रे बघत असते, तेंव्हा ना(ला)यक बेडवर उद्याच्या कपड्यांची तयारी करीत असतो. स्वत:चे कपडे काढत असतो. त्याचवेळी ती ( हो तीच सपना ) खेकसते अरे ए मला उद्या मीटींग वरुन लगेच बंगळुरुला जायचयं तेंव्हा माझे २ /४ सु ट्स जास्त भरुन ठेव.. अमेरिकन टुरीस्टर मध्ये. तो लगेच पडत्या फळाची आज्ञा मानुन जरा जास्तच कापडं कोंबतो. बाकीच सारं आवरुन झोपायला बिचार्याला १:३० वाजतो...

वेळ : ०२:००
अचानक भुकंप झाल्यासारखे त्याला जाणवते. पण हा जो काही भुकंप असतो ख्रराखुरा नसुन तिच्या भ्र. दु. ध्व. कंपनाव्स्थेमुळे होत असतो.एवढ्या अवेळी कोणास हिची आठवण येत आहे?? ह्या (अ) विचाराने तो तडक तो भ्र. दु. ध्व. उचलतो अन् चाटच पडतो, तिने त्याच्यासाठी १ आठवण ठेवलेली असते : "माझ्या प्रेमळ, आज्ञाधारक नवर्या उद्या म्हणजे आज (०२:०० पहाटेचे..) मला ६:०० ला निघायचे असल्याने, मी सकाळी ५:३० ला उठीन असं बघ, अन् तत्पुर्वी चहा, नाश्ता ( जरा जास्तच कारण मी तो कार्याल यातल्या मित्र मैत्रिणीं बरोबर खाइन) तयार ठेव. माझी अ. टु. आणी मां. सं. ह्या ब्यागा (दोन्हीही) खाली गाडीत नेउन ठेव. तसेच वाहनचालक गावी गेला असल्याने तुच मला उडत्या वाहन तळा वर नेउन सोड. आणी हो आता २/१ तास का होइना पण झोप, नाहीतर ऐनवेळी कामं करु शकणार नाहीस.

वेळ : ०६:००.....
????????????
सुंदर, अरे उठ ना... आज तुला फुल फळी (लोकहो Badminton ला दुसरे काय म्हणणार?? )खेळायला जायचं नाही का?? अरे उठ.. मी चहा करुन ठेवलाय.. तो गार होइल..इति - सपना.


महतप्रय्त्ननाने हे महाशय आपले डोळे उघडतात... अन् गारच होतात, सपना त्याच्या समोर एका हातात चहा दुस रया हातात वर्तमानपत्र अशी कसरत करीत असते.

थोडा वेळ त्याला काही कळतच नाही.. तो भराभरा तिला विचारतो, तु अजुन इथे कशी?? कार्यालयात गेली नाहीस? ???? आता मात्र ती वैतागते, अरे माणसा शनिवार आहे आज!! आठवडा (कार्यालयीन कामाचा ) संपला कालच. अजुन तुझा hangover संपलेला दिसत नाहीये.... SSSS SSSS


मग जवळ जवळ ३० मिनिटांनी तो तिची समजुत काढतो... आज दुपारी आपण आपण 'सरकार राज' (म्हाराशट्र का भला जाननेवाला..) बघायला जाउ. शेवटी हो नाही करीत ती २/४ साड्या आणी 'बारीक सारीक दागीने' खरेदी ह्या अटींवर तयार होते. अन् ह्याची परतफेड म्हणुन तो तिचं हलकसं ..... (Censored part )घेतो आणी शयन कक्षाचा दरवाजा धाडकन बंद होतो.वेळ : ०७:०० (संध्याकाळी..)सुंदर च्या डोक्यातील विचारः
...चित्रपट ( अत्यंत वाइट... खर तर हे ही फार छान विशेषण आहे ... असो त्या बाबत नंतर सविस्तर लिहिनच...) आणी ३००० रु. ची खरेदी आज फार काही महाग वाटली नाही.... जर आजची स्वप्न खरी झाली असती तर?? छे हे शक्य नाही... मी आता मदिरा पान करणार नाही... ???? नाही... फार जा स्त करणार नाही...
इकडे सपना च्या डोक्यातील विचारः... चित्रपट इSSSS पण हे काय घडल आज आक्रीत?? एवढ्या खरेदी नंतरही सुंदरने एका चकार शब्दाने सुनावले नाही?? काय झालय काय ह्याला???


वेळ : ०८:३०पुर्ण विचारांती...

सुंदर, सपना आणी त्यांची (दोघांची) मित्र मंडळी हिंजवडी जवळील एका ******* खानपान आणी मदद्यालयात जेवायला जातात.आणी सुंदर सेवकाला ****** मद्य घेउन यायला सांगतो... जेवण होते.... प्रत्येक जण घरी ^-^ आपापल्या परततो.
आणी....


वेळ : ११:००
********** ******** History repeats itself


सदर घटना ही काल्पनिक नसुन, वास्तवात घडलेली आहे. रा. गो. व. च्या नवीन चल चित्रपटाच्या मराठी पट कथेतील हा काहीसा भाग मी येथे exclusively मायबोलीकरांसाठी उपलब्ध करुन देत आहे. :)दीप
"I am not a complete idiot.. some parts are missing"

No comments: