Friday, June 20, 2008

मि.मा.मा.मी.

मि.मा.मा.मी. :)

पाप १ : [म्हणजे - पात्र परिचय १ :) ]
पार्टी मामा: स्लार्टी (नायक)
मी : कुलदीप१३१२ (Creative head) कथेचा!! आजन्म विद्यार्थी, आणी बरच काही....
केतन भगत: (तीन पुस्तकांचा लेखक, भा.व्य्.सं.अ. चा पदवीधर(IIM - A) आणी बरच काही....
अनुषा भगत: (केतनची सहधर्मचारिणी, आणी 'MAAYबोली' ची नियमीत वाचक, पंखा)आणी बरच काही....

इतर पाप: कथेच्या गरजेनुसार add केली जातील...

भाग १

वेळ शनिवार सकाळ १०:००
स्थळ माझं घर..
आज सकाळी लवकर(९:३० वा.) उठुन नेहमीप्रमाणे मी सर्व पेपर वाचले, आणी आता कुठे पोहे खात idiot box वर NDTV,CNBC surf करत होतो. कसल्या तरी टुकार चर्चा चालु होत्या.. म्हणे केतन भगत ने ३रे पुस्तक केवळ स्वता:च्या publicity, marketing gimmicks वर खपवले होते. (तसच बघायला गेल तर मला काही हे पुस्तक आवडल होत असं नाही, पण channelवाली विचारत होती की तुम्हाला काय वाटतं?? opinion polls, market sale, all time hit blah blah blah ते आम्हाला या क्रमांकावर phone/ sms करुन कळवा आणी जिंका केतन बरोबर एक रम्य संध्याकाळ.. all crap .... शेवटी मी वैतागुन I.B. / TV बंद केला व मायबोली वर संचारु लागलो. इथं बघतो तो काय GAS1 नी एक मु. मा. :) (मुकेश माचरकर) टाईप समिक्षाच केली होती. मला खर तर त्यातल एकच वाक्य आवडल (समिक्षेतल) किंमत पंच्याण्णव रुपये फक्त. 'सो चीप !!!!' ही माझी पहिली प्रतिक्रिया होती, किंमत वाचल्यावर आणि मग पुस्तक वाचल्यावरही.>>> पुस्तकात काही दम नव्हता... तीन मित्र, एक मित्राची बहीण, हिंदू, मुसलमान, गुजरात, लेखक अहमदाबादेत एका इ- पत्रा मुळे येतो काय, आणी दुसर्याच दु:ख स्वता :च्या स्टोरीत मांडुन पोळी भाजुन घेतो काय.... सारच कसं 'सो चीप' पण त्याच वेळी मला हे ही जाणवल की हे 'सो चीप' पुस्तक बर्याच जणांनी वाचलय... म्हटल आपण ही( पुस्तक) वाचु, मगच प्रतिसाद देउ... शेजारच्या पमीकडुन घेतल पुस्तक... अर्ध पुस्तक वाचल असतानाच पमी आली आणी म्हणाली अरे मला पुस्तक लगेच हवय कारण उद्या book review आहे. & if it goes fine then we are planning to do one act play... मी काय बोलणार terrace वरच्या kissing seen पर्यंत पोहोचलो होतो :) तोच ही पमी कडमडली..... शेवटी दिल पुस्तक आणी मग परत मायबोली/Facebool/orkut/gtalk/gmail...... वर आलटुनपालटुन संचारु लागलो.

तेवढ्यात gmail वर एक mail आली. unknown mail होती पण email id काहीतरी वेगळा होता म्हणुन मी email open केली... केतन भगतच्या नावाने कुणीतरी mail पाठवली होती... मी समजलो कुणीतरी भंकस करतय... so I deleted the mail. तोपर्यंत १२ वाजले होते. आज सर्व जण पुण्यनगरीत एका मामाच्या मुलीच्या मोठ्या मुलाच्या लग्नाला गेले होते, आणी जेवणाची काहीही तरतूद नव्हती मग काय घेतली अंडी उकडवायला, कांदा चिरुन ब्रेड भाजुन, करी तयार केली. एकीकडे चहा टाकला, भरपुर आल टाकुन... असा जेवणाचा आगळा बेत करुन
मी 'In a good company' बघत बसलो. जेवण झाल, आणी मी झोपायला जाणार एवढ्यात फोन वाजला मला कळेना भर दुपारी १:३० वाजता कोण बोंबतय तर म्हणे तुमच्याशी बोलणे अत्यंत महत्वाचे असल्याने मी एवढ्या दुपारी फोन केला... मी जरा रागातच ओरडलो कोण आहे SSS पु. ल. जसा आवाज काढतात ना (तुम्हाला कोण व्हायचय मुं. पु. ना. मध्ये) तसा. तर म्हणे मी केतन भगत बोलतोय (आवाज एकदम खर्जातला ...Just like I ‘m god talking in 1 night @ call centre) मी म्हटल हा wrong number आहे. मी एक सर्वसामान्य, सुजाण, शांतताप्रेमी, सहनशील नागरिक आहे. मला दुपारची झोप... तर मला मध्येच तोडत तो म्हणाला की तु sorry तुम्ही मायबोलीवरील सदस्य आहात ना? आता मला कळेना की एका अ(तिशय) सामान्य सदस्याकडे ह्याच काय काम?? मी म्हटलं हो आहे त्याचा इथे काय संबंध? तु मला झोपु देणार आहेस की नाही?? केतन म्हणाला फक्त अर्धा तास हवाय तुमचा पाहिजे तर मी appointment घेउन येइन... पण जर आजच जमल तर बर होइल... मी म्हटल ठीक ४:३० वाजता या पता लिहुन घ्या... (मनात काय कटकट आहे.. एकच शनिवार त्यात अर्धा गेलेला आणी हा...)

तर केतन म्हणाला नको मी येइन की शोधत शोधत.... मला राग आला, (मी मनात काही कुणी मोठा माणुस नाहीये की सगळ्यांना माझ्या घरचा पता माहित असेल) .... तुला जे हव ते तु कर मी ठीक ४:३५ मि. नी निघुन जाइन (आता माझ्या अंगात निशा माझी boss संचारली होती... meeting ला ५ मि. उशीर चालत नाही हिला) तर हा म्हणाला I will be there by sharp 4:30! मी विचार केला शनिवारी दुपारी हा काय येणार... असा विचार करत पं. जसराज ऐकत झोपलो..

ठीक ४:३० च्या ठोक्याला बेल वाजली मी विचार केला जर हा केतन आलाच असेल तर अर्ध्या तासात कटवू. दरवाजा उघडुन बघतो तो काय....... एक अतिशय सुंदर तरुणी, छान छोटासा बुके घेउन उभी होती. :) (सर्व प्रथम माझ्या मनात विचार आला की ही नक्कीच बुके विकायला आलेली असणार... मी तिला सांगणार की हमको ये बुके घेणेका नही है.. हिंदीस हासु नये माझी माझी ती काय मायबोली नाहीये :) ) मी असं काही बोलणार एवढ्यात ती विचारते कशी... Is Mr. Deepak at house? :) घ्या आता ही बया मलाच विचारत होती की मी घरी आहे का?????

Take a break for now... will c u soon... :) bye for now!

5 comments:

Bhagyashree said...

hehehe far awdla !! patkan liha pudhche bhag!

Bhagyashree said...

oh..thanks for linking my blog !! :)

Deep said...

he bhagyshree thanks a lot! liha naahi lihi as mhn me ajun lahan aahe :)(& BTW me tula tu mhnnyaachee sandhee ghetoy! :) )

Khr tr lihin zaaly almost but I thought hyaat kaay Inodee naheeye as no comment was there... so publish kraych thaambv. well kaahe badl krun ajjch publish krto!

Deep
"नकार देणे ही कला असेल. पण , होकार देऊन काहीच न करणे, ही त्याहून मोठी कला आहे."

HAREKRISHNAJI said...

I was here

Deep said...

I was here>> HK, I'm not getting... can you please xplain :)
Deep
"नकार देणे ही कला असेल. पण , होकार देऊन काहीच न करणे, ही त्याहून मोठी कला आहे."