घ्या आता ही बया मलाच विचारत होती की मी घरी आहे का?????>>>
आता मला कळेना की सांगाव का की मीच तो... नाही तरी दुसरं कोण होत सांगणार म्हणा त्यावेळी तिथं :) हे सगळ मनात चालु असताना ही बाहेरच काहीशी अवघडुन उभी होती. तिनं परत विचारल Is Mr. Deepak at house? actually I'm Anusha Anusha Bhagat.. Ketan Bhagat's wife! Actually Ketan is parking the car so.. (खळ्ळ ख्ळ्ळ्ळ असा मोठा आवाज झाला. मला पहिल्यांदा वाटल की हा ही आवाज माझ्या मनातच झाला...) पण नाही परत एकदा आवाज झाला आणी बाहेर येउन बघतो तो काय.. पार्किंग करत असताना केतनने बाजुला असलेल्या दोन मोठ्या sliding windows फोडल्या होत्या. (आता चिटणीस काकू सगळ्या सोसायटीत बोंबा मारीत फिरणार होत्या... त्यांच्याच जुन्या खिडक्या होत्या न त्या...) मी आणी अनुशा धावतच बाहेर आलो केतन ओशाळला... म्हणाला I'm extremely sorry really... I'll pay for that!मी म्हटल की ते बघू नंतर... आणी मी स्वपरिचय करुन दिला - Hi ketan/Anusha, I'm Deepak please come in.... be comfertable
त्या दोघांना हॉल मध्ये(होय हॉल मध्येच... दीवाणखाना वगैरे अकबराच्या जमान्यात :) ) बसवुन मी पटकन कॉफी बनवायला घेतली. मला जरी कितीही चहा आवडत असला तरी, विशेष पाहुण्यांसाठी आई कॉफीच देते हे मी observe केले होते आणी तेच follow करत होतो.इतक्यात मी पटकन बाहेर पाणी देउन आलो...(हो पाणी हवय का?? असं २-४ दा नुस्तच विचारणारे टिपीकल को. ब्रा. आम्ही नव्हे.:) )
मी सहज विचारल्यासारखे केतनला विचारले, की तु ... सॉरी तुम्ही तर म्हणाला होतात की तुमच काहीतरी काम आहे अर्जंट बोलायचे आहे... केतन: अरे म्हण की तुच... चालेल मला.
(तसा तो मला 'त' वरुन ताकभात ( आता त वरुन ताकभातच का?? तांम्ब्या का नाही हा एक वेगळा प्रश्न आहे) ओळखणारा वाटला) लगेचच तो विषयावर आला.. actually महत्वाचेच का म आहे म्हणून मी अनुशाला बरोबर घेउन आलो. [आता मला कळेना की महत्वाचे काम याचे.. मग अनुशा काय त्याची पी. ए./ प्रवक्ती/ वकील... म्हणून आली आहे? :) स्त्रीजाती बद्दल मला अत्यंत आदर असुन येथे कोठेही मनातही त्यांचा अनादर करण्याचा हेतू नाही! हे सर्व feminist/ आणी इतर स्त्री अन् पुरूष मंडळीनी ध्यानात घेणे :) ]
Ketan continued... अरे अनुशा मायबोलीची नियमीत वाचक आहे I mean fan / पंखाच म्हणना! [आता मी चाट! पंखा म्हणजे जरा अतीच झाले होते. मला दाट संशय येउ लागला होता की हा मुद्दामच तसं बोलतोय.. म्हणजे.. ते म्हणतात ना.. when in rome behave like a raman / gentleman अगदी तसच! त्यातुन हा IIM grad.] आणी तरीही माझ्या डोक्यात प्रकाश पडेना की अनुशाचे काय काम इथे... बहुदा त्याच्या डोक्यात पडला प्रकाश... किंवा आपण अस म्हणू की त्याला माझ्या चेहेर्या वरचे/ डोळ्यातले भाव वाचता आले. [ राव खरतर ह्या भाव वाचण्याची कला जर मला अवगत असती ना तर आतापर्यंत ४ ब्रेकअप - ते ही अधुरे... लटकते माझ्या नशीबी आले नसते. किंवा जर हीच कला जर तिला आली असती नाss तर ४ अर्धे ब्रेकअप तरी झाले नसते :) असो.!!]
केतन: अरे मी सांगतो सार पण मला थोडा वेळ दे... [वेळ?????? माणसाच्या जीवनातली एक अमुल्य चीज!(जी गेल्यानंतरच महत्व कळते:) ) तीच तो माझ्याकडे मागत होता आणी ते ही शनिवारी?? वीकएन्डला?] मी विचार केला की जर जवळ जवळ संध्याकाळ होत आलीच आहे तर क्यु ना BRU ho jaaye! आणी त्वरीत मी त्या दोघांना विचारल... कॉफी चालेल ना? पहिल्यांदा केतन, अनुशा म्हणाले नको अरे आम्ही आत्ताच जेवुन आलो आहोत. [मी मनात च्यायला आता जर खरच ह्यांनी कॉफी घेतली नाही तर ही सगळी फुकट तरी जाईल नाहीतर मलाच प्यावी लागेल. :( ]मी म्हटल (प्रगट) अहो प्लीज घ्या ना तशी कॉफी काय मी फार वाईट बनवत नाही. आणी तुम्ही दोघेही पहिल्यांदाच माझ्या घरी येताय तेंव्हा निदान कॉफी घ्याच. मी येतोच दोन मिनिटात कॉफी घेउन..
केतन: अरे आम्ही येउच की आता सारखे सारखे तेंव्हा कॉफी काय जेउनच जाऊ.
मी: मनातच :( [आता सारखे सारखे >>> ??? का?? म्हणजे काय? आणी माझं काय कॉफीच दुकान आहे की घराबाहेर बोर्ड लावलाय> मोफत खानावळ :( ]
मी त्या दोघांनाही किचन मधून सांगितल.. [हो आतून बाहेर आवाज नीट पोहचत नाही :( असं आमच्या पितामहांच म्हणण...) की ते काहीही चालणार नाही तुम्हाला कॉफी घ्यावीच लागेल. माझ्या लवकरच लक्शात आल की पितमहांच्या आणी ह्या दोघांच्या श्रवणेंद्रियात १५-२० वर्षांचा फरक आहे. पण आता काय करणार म्हणून मी hide & seek ची बिस्कीटं सुद्धा ट्रे मध्ये ठेवली आणी कॉफी घेऊन बाहेर आलो.
तर निवांत कॉफीपान चालू असताना अनुशाने विचारल की तू काय करतोस?
[ख्रर तर हा एक फार मोठा गहन, गंभीर आणी गंमतीशीर प्रश्न आहे (आणी चरचेचा ही!!)
फक्त गंभीर की गंमतीशीर हे विचारण्यावर आणी विचारण्याच्या वयावरही :) अवलंबून असते!
मी काय करतो???
{६ महिन्यां पुर्वीची अशीच एक शनीवारची रम्य संध्याकाळ... that was my LWD @ ****. आणी entrance चा result लागला होता. I was really happy! got admission! मी म्हणूनच राजीनामा दिला होता. तेंव्हा माझ्या एका आजोबांनी मला विचारल होत, की आता तू कुठे आहेस काय करतोस? त्यावेळी मी अतिशय गंभीरपणे अगदी सविस्तर सांगितल की मी नोकरी सोडून पुन्हा शिकतोय. आणी त्यांनी मला तितक्याच गंभीरपणे समजवायला सुरूवात केली, की आता कश्या पूर्वी सारख्या नोकर्या त्यासुद्धा सुरक्षित.. मिळत नाहीत आणी तू नोकरी सोडून परत काय शिकतोयस?? अन् आव तर असा की शिकून कुणाच भल झालय? [स्वः त मात्र फॉरेनात जाऊन दोन दोन डीग्र्या घेऊन आलेत हे!]
त्यावेळी अन् त्यानंतर प्रत्येक वेळी मी त्यांना आणी एकंदर सगळ्यांनाच मी आत्ताच MBA करण किती गरजेच आहे हे पटवायचा निष्फळ प्रयत्न करतोय(आणी आता तर माझी खात्रीच पटल्येय की ह्यांना पटवण्यापेक्षा एखादी मुलगी पटवणे अधिक सोपे आहे.)
आणी परत जेंव्हा कुणी मला हाच प्रश्न विचारत तेंव्हा मला फारच गंमत वाटते.. आणी मी त्यावेळी मूड नुसार मनात येईल ते उत्तर देऊन टाकतो. }मी काय करतो???>> तर अनुशाच्या ह्या प्रश्नाला मी उत्तर दिल की मी सध्या लिहितोय..
अनुशा: काय लिहीतोस?
मी: काहीही... जे मनात येईल ते कागदावर उतरवतो
अनुशा: नाही म्हणजे विनोदी, ललित, कथा की कविता??
मी: [मनातच :(लिखाणाचे हे एवढे प्रकार मी पहिल्यांदाच ऐकत होतो नाहीतर मला आपल वाटायच की विनोदी फक्त इकडे पु. ल. आणी तिकडे वुडहाउस, आणी कथा म्हणजे मतकरीच! बाकी ललित, कविता ही अनुक्रमे मुलाची आणी मुलीची नावे आहेत असा माझा ठाम समज होता. यापैकी ललित हे एका मुलीच ही नाव असल्याच मला दोन दिवस आधी कळल :) ]
मी: प्रगट- मी सध्या ब्लॉगवर लिहितोय. specific असं काहीही नाही.
तर अस आमच (सुखद) संभाषण चालूच राहील असत पण केतन मध्ये (कडमडला) बोलला, अरे वा अस कस आम्ही तुझे ब्लॉग वाचल्येत आत्ताच गाडीतुन येताना काय सही लिहितोस तू! keep it up man its a great beginning... blah blah तो आणखी बरच काही बडबडला पण त्याच्या त्या वाक्या ने मी वेळीच सावध झालो आणी कळल की हे उगाच आपल मला हरभर्याच्या झाडावर चढवतायत... तो म्हणाला होता ... आणी म्हणूनच माझं हे काम तूच करशील अस मला वाटत...
मी: एवढ काही ग्रेट लिहीत नाही.. (आणी मी विचार करायला लागलो की मी खरच का लिहीतोय??... असो ते नंतर कधीतरी ) हं... ते जाऊदे खरतर मी जे काहे लिहितो ते स्वतःसाठीच! त्यात ग्रे ट काही नसेलही.. ते जाऊदे (घ ड्याळाकडे पहात ५:१५) काय एवढ महत्वाच काम होत माझ्याकडे?
केतन: मी काही लेख वाचल्येत माय बोलीवरचे जस की: SAR, DAD, GAS, etc. & he explained: S:larti, A:rch, R:uni & so on.. आणी म्हणाला सॉरी मी कोड मध्ये बोललो.. माझ्या चेहर्यावरच्या प्रतिक्रिया ओळखत तो बोलू लागला, मी GAS च्या 'The 3 mistakes..' ह्या परिक्षणावर आलो, frankly तस ते मला फारस पटलेल नाहीये, पण लिहलय फार दाद देण्याजोगच. तर हे सार वाचून माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे ( हे proudly अनुशाकडे बघत)
(मी मनात: हे वाक्य अनुशा कडे बघुन म्हणायची काय गरज? maybe त्या वेळे पुरत डोकं अनुशा कडून ऊधार घेतल असावं :) )
मी प्रगट: माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे >> ते तुझ्या कल्पनेवर आणी माझ्या मुडवर अवलंबुन आहे लवकर बोल!
केतन: मिमामी करायच ठरवल आहे.
मी: तू मामा/ i mean मामी?? कुणाला??
केतन: i'm sorry!! used jargon..
मी: (मनातच तेवढ कळत मला IIM grad असल्याचा आणखी एक फायदा..) हं बोल ना मग नीट..
केतन: मिमामी: stands for MISSION MAAYBOLEE MARKETING! >"मायBOLY" will be logo! colors we will decide soon.. once we are through with this meeting, launch will be grand we will have 3a's, 3s's &..
मी: अरे तू आत्ता कॉफीच घेतलीस ना?? काय बोलतोयस काय तू?? आणी हे काय टेनीस आहे का ३ एस काय आहे ही भानगड??
केतन: अरे हो जर थांब you found it intersting na?? :खोखो: , Anusha I knew it now this project wll be 200% successful!
मी: अरे पण काय चाललय काय हे??
केतन: you wait for some time! Every thing in this world comes on time! & that time will come soon be patient! :)
16 years ago
2 comments:
मला कुणी विचारलं की तू काय करतोस, तर मी गंभीर चेहरा करून सांगतो.. "पृथ्वीची एंट्रोपी वाढवतो" म्हणून... :)
हा हा! अरे पण अस प्रत्येकाला दरवेळी सांगू नाही शकत ना तू? आणी जेंव्हा शिक्षण संपवून नोकरी चालू असेल आणी जर तू परत... मी आता शिकणार आहे.. असं जेंव्हा सांगतोस ना, तेंव्हा समोरचा/ची बाँब पडल्या सारखी कोल्ड लुक देतो (आता मला सवय झाल्ये त्याची) :)
Post a Comment